घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरशिवसैनिक आणि संदिपान भुमरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसैनिक आणि संदिपान भुमरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

Subscribe

शिवसेनेचे माजी मंत्री संदिपान भुमरे एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर आदित्य ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरेंनी मुंबईत निष्ठा यात्रा काढल्यानंतर बंडखोर लोकसभा खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा सुरू आहे. आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा काल संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात होती. या यात्रेनंतर एका शिवसैनिकाने भुमरे यांना फोन लावला होता. या फोन कॉलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

काय म्हणाला शिवसैनिक –

- Advertisement -

यावेळी योगेश क्षीरसागर या शिवसैनिकाने माजी मंत्री संदिपान भुमरे यांना फोन लावला होता. क्षीरसागर याने संदिपान भुमरेंना तुमच्या पैठण मतदारसंघात आदित्य ठाकरेंची रॅली निघाली, तुम्हाला मतदान करणारे लोक त्यांच्यासोबत जातील असे सांगितले. तुम्ही असे करायला नको होते, मी कट्टर शिवसैनिक आहे, पैठण आपल्या जिल्ह्यात येत ना, असा सवाल योगेश क्षीरसगार यांनी संदिपान भुमरे यांना केला.

भुमरे काय म्हणाले –

- Advertisement -

संदिपान भुमरे यांनी त्या शिवसैनिकाला सुनावले. आदित्य ठाकरेंची रॅली निघाली, त्याला गर्दी झाली आपण देखील रॅली काढू, असे म्हटले. भुमरे यांनी त्या शिवसैनिकाला भेटायला बोलावले. यावर कार्यकर्ता मी कधी भेटायला कधी येऊ, असे विचारतो. त्यावर संदिपान भुमरे यांनी आपण देखील रॅली काढू असे म्हटले आहे. संबंधित शिवसैनिकाने संदिपान भुमरे यांना भेटायला येण्याचे मान्य केले आणि फोन ठेवला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -