आरे कारशेडसाठी दररोज वृक्षतोड सुरूच; प्रकरण पोहोचलं सर्वोच्च न्यायालयात

cm eknath shinde

मुंबईतील आरे वन क्षेत्रातील वृक्षतोडीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. १८०० एकर जागेवर पसरलेले आरेचे जंगल हे मुंबईचं फुफ्फुस मानलं जातं. कोर्टाकडून याप्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र, अद्यापही सुनावणीची तारीख जाहीर झालेली नाही. (Aarey car shed case in supreme court)

हेही वाचा – मला तू ओळखतेस का? असे पंतप्रधान मोदींनी विचारताच ८ वर्षीय बालिका म्हणाली…

याचिकाकर्त्यांचे वकील अनिता शेनॉय यांनी आरेतील वृक्षतोडीची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.वी. रमना यांना दिली होती. आरेत राजरोसपणे वृक्षतोड केली जात असल्याचंही शेनॉय यांनी रमना यांना सांगितलं. त्यामुळे याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही सुनवाणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होईल, असं रमना यांनी सांगितलं.

कायद्याचा विद्यार्थी असलेला ऋषभ रंजन याने आरेतील वृक्षतोडीबाबत एक पत्र  लिहिलं होतं. या पत्राची दखल घेत आरेतील वृक्षतोड थांबवण्याचे निर्देश सरन्यायाधीशांनी दिले होते. तसेच, त्या पत्राची जनहित याचिकेत रुपांतर करावे असेही आवाहन करण्यात आले होते.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर, कोणाकडे कोणती पदे?

मेट्रो ३ मार्गिकेसाठी कारशेडची उभारणी आरे येथे प्रस्तावित करण्यात आला आहे. भाजप सरकारने हा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलवण्यात आला. मात्र, केंद्र सरकारने कांजूरच्या कारशेडला विरोध करत प्रकरण न्यायालयात नेले.

हेही वाचा – मेट्रोचे डबे आणण्यासाठी आरेमध्ये पुन्हा वृक्षकत्तल? पर्यावरणप्रेमी संतापले

अडीच वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले आणि पुन्हा शिंदे-फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आलं. हे सरकार सत्तेवर येताच मेट्रो कारशेडसाठी आरेवर लावलेली स्थगिती हटवण्यात आली आणि कामाला वेग देण्यात आला. दरम्यान, आरेमध्ये पुन्हा वृक्ष छाटली जाणार नाहीत, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, त्यांनी त्यांचा शब्द पाळला नसून राजरोसपणे वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशहून मेट्रोचे डबे मुंबईत दाखल झाले. हे डबे आरेतून तात्पुरत्या कारशेडपर्यंत पोहोचवण्याकरता मार्गातील काही झाडे कापले असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणवादी आक्रमक झाले असून सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचले आहे.

हेही वाचा – आरे कॉलनीतील वाहतूक 24 तासांसाठी बंद, झाडे तोडली जात असल्याचा पर्यावरणप्रेमींना संशय