Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र औरंगाबादमध्ये ११३ कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ; हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबादमध्ये ११३ कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ; हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू

Subscribe

एकूण बाधितांची संख्या २ हजार ६३९ वर पोहोचले आहेत

मुंबई पुण्यासह आता औरंगाबादमध्ये देखील कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी सकाळी ११३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ७३९ वर पोहोचली आहे. यापैकी १ हजार ४५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासह १४५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सध्या १ हजार १४३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे

राजाबाजार (२), न्यू हनुमान नगर (२), बायजीपुरा(१), खोकडपुरा (२), बांबट नगर, बीड बायपास (२), साई नगर, एन सहा (२), राजमाता हाऊसिंग सोसायटी (१), माया नगर, एन दोन (३), संजय नगर, आकाशवाणी परिसर (१), रशीदपुरा (२), यशोधरा कॉलनी (२), सिडको पोलिस स्टेशन परिसर (१), सिल्क मील कॉलनी (१), किराडपुरा (१), पीरबाजार (१), शहानूरवाडी (१), गजानन मंदिर परिसर, गारखेडा (२), अहिल्या नगर, मुकुंदवाडी (१), जहाँगीर कॉलनी, हर्सुल (१), कैलास नगर (१), समर्थ नगर (१), छावणी परिसर (४), गौतम नगर (१), गुलमंडी (५), भाग्य नगर (१), गजानन नगर, गल्ली नं नऊ (४), मंजुरपुरा (१), मदनी चौक (१), रांजणगाव (१), बेगमपुरा (१), रेहमानिया कॉलनी (१), काली मस्जिद परिसर (१), क्रांती चौक परिसर (१), विश्रांती नगर (१), कन्नड (५), जिल्हा परिषद परिसर (४), देवगिरी नगर, सिडको वाळूज (१), बजाज नगर (१५), राम नगर (१), देवगिरी कॉलनी सिडको (२), वडगाव कोल्हाटी (२), स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी (१), नक्षत्र वाडी (२), बकलवाल नगर, वाळूज (१), सलामपूर, पंढरपूर (११), वलदगाव (१), साई समृद्धी नगर कमलापूर (२), अज्वा नगर (१), फुले नगर, पंढरपूर (४), गणेश नगर, पंढरपूर (१), वाळूजगाव, ता. गंगापूर (१), शाहू नगर, सिल्लोड (१), मुस्तफा पार्क, वैजापूर (१), अन्य (२) या भागातील कोरोनाबाधित आढळले आहेत. यासर्व कोरोनाबाधितांमध्ये ३८ महिला आणि ७५ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

खासगी रुग्णालयात वयवर्ष ५० वरील दोघांचा मृत्यू

- Advertisement -

रविवारी खासगी रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू झाला. यात बारी कॉलनी येथील ५२ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला ३१ रोजी दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू जहांगीर कॉलनी येथील ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाचा झाला. हा रुग्ण १२ रोजी रुग्णालयात भरती झाला होता. रविवारी सकाळी साडे दहा वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पुण्यात एका दिवसात १४ रुग्णांचा मृत्यू

पुण्यात एका दिवसात १४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. पुण्यात आतापर्यंत ४३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसात २५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या ९ हजार ३३६ वर पोहोचली आहे. दरम्यान, पुण्याचा मृत्यूदर हा देशाच्या मृत्यूदरपेक्षा सर्वाधिक आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.


Corona Live Update: केंद्रात महत्त्वाची बैठक; गृहमंत्री, आरोग्य मंत्री उपस्थित
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -