सत्तार – दानवेंच्या वक्तव्यामुळे शिंदे गट – भाजपमध्ये वादाची ठिणगी! येत्या निवडणुकांमध्ये काय होणार?

aurangabad cm eknath shinde abdul sattar and bjp raosaheb danve clash over election

राज्यात भाजपा- शिंदे सरकार सत्तेत आले तरी दोन्ही गटांतील नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. यात राज्याचे कृषी मंत्री आणि शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही होता थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नेमकं होत होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. काल सत्तार यांनी माझ्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती नको तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी असे म्हटले. यावर उत्तर देत रावसाहेब दानवे यांनी मैत्रीपूर्ण कसली, कुस्ती हवा असा टोला लगावला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधीच दोघांमधील शाब्दिक वाद पुन्हा एकदा रंगतोय.

तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशा म्हणीप्रमाणे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या युतीवरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळाले. यात राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही अलबेल असताना अब्दुल सत्तार यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण आगामी स्थानिक निवडणुकीत माझ्या मतदारसंघात भाजप नकोच अशी भूमिका घेत मैत्रीपूर्ण निवडणूक व्हावी असं अब्दुल सत्तार यांनी थेटपणे बोलून दाखवलं आहे. इतकचं नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी भूमिका घ्यावी असंही सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तार एवढ्यावरचं थांबले नाही तर माझ्या मतदारसंघासारखी इतर ठिकाणी जर परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत व्हावी असंही ते म्हणाले.

दरम्यान शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारातही भाजपचा विरोध असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यात अलीकडे एक महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर करण्यापूर्वीचं सत्तारांनी जाहीर करून टाकला. यावेळी फडणवीसांनी सत्तारांना चांगलेच खडेबोल सुनावले होते. यामुळे भाजप आणि सत्तार यांचे जमत नसताना आता सत्तारांनी भाजप आपल्या मतदार संघात नकोच अशी भूमिका घेतली आहे. तर सत्तार कुणाचेच नाहीत, ते उद्या शिंदे गटात राहतील की नाही याचीही खात्री नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

यात शिंदे गटावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना भाजपचे नेते सडेतोड उत्तर देत आहे. मात्र दुसरीकडे याच शिंदे गटातील सत्तार मात्र निवडणुकीत भाजपला सोडून निवडणूक लढण्याची भाषा करत आहेत. यामुळे शिंदे – भाजप युती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाहायला मिळणार ती मैत्रीपूर्ण लढत हा प्रश्न उपस्थित होत आहे.


अशा अनेक धमक्या आल्या, मी त्याला भीक घालत नाही; मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया