औरंगाबाद हादरले, कॉलेजबाहेरून विद्यार्थीनीला फरफटत नेत केली हत्या

औरंगाबाद येथेही प्रेमप्रकरणातून अशीच भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे.

देशभऱात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असून दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रही महिलांसाठी असुरक्षित राज्य झाले आहे. औरंगाबाद येथेही प्रेमप्रकरणातून अशीच भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. दिवसाढवळ्या देवगिरी कॉलेजबाहेरून विद्यार्थीनीला २०० फूट फरफटत नेत माथेफिरु तरुणाने तिची धारदार चाकूने हत्या केली . या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मृत तरुणी १९ वर्षांची असून बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून प्राथमिक माहितीनुसार प्रेमप्रकरणातून ही घटना घडली आहे.