Corona Update : एका रात्रीत औरंगाबादमध्ये नव्या ३६ रूग्णांची नोंद!

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी नव्या ३६ रूग्णांची नोंद करण्यात आली. त्याचबरोबर अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत १३७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १०,८०३ वर पोहचली आहे. औरंगाबादमध्ये आत्तापर्यंत ६१४१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

तर औरंगाबदमध्ये आत्तापर्यंत ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर औरंगाबादमध्ये ४२६६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत १३७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. औरंगाबाद कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिकेने अत्यावश्यक वस्तूं विक्रेत्यांची अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.


हे ही वाचा – पावसाचा जोर ओसरला तरी ‘या’ राज्यात कमी दाबाचा पट्टा कायम!