घर महाराष्ट्र विचाराचं प्रदूषण करणाऱ्यांवरही उपचाराची गरज; फडणवीसांचा विरोधकांना टोला

विचाराचं प्रदूषण करणाऱ्यांवरही उपचाराची गरज; फडणवीसांचा विरोधकांना टोला

Subscribe

खरं म्हणजे टीव्ही किंवा इतर माध्यमातून विचाराचं प्रदूषण करणाऱ्यांवरही या ठिकाणी उपचार होण्याची गरज आहे आणि जर मानसोपचार करण्याच्या पलिकडे गेले असतील तर त्यांना पागलखान्यात टाकलं पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनानिमित्त विरोधकांवर निशाणा साधला. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत महआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद शहरातील अयोध्यानगरी मैदनावर आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला. ( Aurangabad Devendra Fadnavis in Maha Arogya Camp trolled Oppositions )

फडणवीस म्हणाले की, शहरातील महाआरोग्य शिबिरात सर्व प्रकारचे डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. शिवाय मानसोपचारतज्ज्ञही उपलब्ध झाले आहेत. खरं म्हणजे टीव्ही किंवा इतर माध्यमातून विचाराचं प्रदूषण करणाऱ्यांवरही या ठिकाणी उपचार होण्याची गरज आहे आणि जर मानसोपचार करण्याच्या पलिकडे गेले असतील तर त्यांना पागलखान्यात टाकलं पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनानिमित्त विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisement -

या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाठ, आमदार नारायण कुचे, विजया रहाटकर, आयोजन राजेंद्र साबवळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

काय म्हणाले फडणवीस?

राज्यातील शासन हे गरिबांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात तळागाळातील गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

शहरातील महाआरोग्य शिबिरात सर्व शिबिरात सर्व प्रकारचे डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. शिवाय, मानसोपचार तज्ज्ञही उपलब्ध झाले आहेत. खरं म्हणजे टीव्ही आणि इतर माध्यमातून महाराष्ट्रात विचारांचं प्रदूषण करणाऱ्यांवरही या ठिकाणी उपचार होण्याची गरज आहे आणि जर ते मानसोपचार करण्याच्या पलीकडे गेले असतील तर त्यांना पागलखान्यात टाकलं पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिराच्या उद्धाटनानिमित्त विरोधकांवर निशाणा साधला.

( हेही वाचा: ‘हे’ चांगल्या नेत्याचे लक्षण, मोदींचे कौतुक करत संजय राऊत यांची फडणवीसांना कोपरखळी )

- Advertisment -