Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शिर्डीत भीषण अपघात; विद्यार्थ्यांनी भरलेली बस टोल नाक्यावर धडकली

शिर्डीत भीषण अपघात; विद्यार्थ्यांनी भरलेली बस टोल नाक्यावर धडकली

Subscribe

शिर्डीत विद्यार्थ्यांच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा टायर निखळल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे. टायर निखळल्यानं ही बस बंद पडलेल्या टोलनाक्यावर आदळली. बसमध्ये 40 विद्यार्थी तसंच 6 शिक्षक होते

शिर्डीत विद्यार्थ्यांच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा टायर निखळल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे. टायर निखळल्यानं ही बस बंद पडलेल्या टोलनाक्यावर आदळली. बसमध्ये 40 विद्यार्थी तसंच 6 शिक्षक होते.हा अपघात मध्यरात्री 1 च्या सुमारास घडला.  या अपघातात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु, सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. औरंगाबाद येथील तापडीया कोचिंग इन्स्टिट्यूटचे हे सर्व विद्यार्थी होते. ( Aurangabad Fatal accident in Shirdi A bus full of students hit the toll booth Tapdia Coaching Institute )

भंडारदरा पर्यटनाहून औरंगाबादच्या दिशेने परतत असताना पिंप्री निर्मळ टोलनाक्यावर या बसला अपघात झाला. मुख्य दरवाजा लॉक झाल्यानं विद्यार्थी बसमध्ये अडकले होते. स्थानिक युवकांनी मदतकार्य करत विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. लोणी पोलिसांनी पर्यायी बसची व्यवस्था करत विद्यार्थ्यांना संभाजी नगरकडे रवाना केलं.

कसा झाला अपघात?

- Advertisement -

या बसचं चाक निखळलं. त्यामुळे बस टोलनाक्याच्या दुभाजकाला जाऊन आदळली. अपघातानंतर या बसचा दरवाजा लॉक झाला. मात्र, बसची काच फुटली आणि त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी तिथून बाहेर पडत आपली सुटका केली. समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातात 4-5 विद्यार्थ्यांना किरोकळ दुखापत झाली आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

( हेही वाचा: विकास निधीवरून सत्तेतील आमदार आमने-सामने; पालकमंत्र्यांना घातला घेराव )

- Advertisement -

- Advertisment -