घरताज्या घडामोडीसंतापजनक! नराधम आईने पोटच्या मुलाचे मुंडकेच कापले कारण...

संतापजनक! नराधम आईने पोटच्या मुलाचे मुंडकेच कापले कारण…

Subscribe

२० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

एका नराधम आईने अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाचे मुंडके छाटले आहे. हा धक्कादायक प्रकार औरंगाबाद घडला आहे. अर्भकामुळे होणारी बदनामी टाळण्यासाठी या मातेने अर्भकाचे मुंडके छाटून वेगळे केलं आहे. या नराधम मातेसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. २० जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. माने यांनी गुरुवारी दिले आहेत. महापालिकेचे साफसफाई सुपरवायझर सतीश लिंबाजी मगरे यांनी तक्रार दिली.

गीताबाई अजय नंद (वय ३४) असं या नराधम आईचे नाव आहे. रतनलाल भोलाराम चौधरी (वय ७५), गंगाबाई रतनलाल चौधरी (वय ७०) व हरीशकुमार सुभाषलाल पालीवाल (३८, सर्व रा. दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे, छावणी मोहल्ला) अशी तिच्या साथीदारांची नावे आहेत.

- Advertisement -

२९ एप्रिल रोजी सकाळी पावणेसहा वाजता मगरे हे हाताखालील कर्मचाऱ्यांना ड्युटीचे वाटप करीत होते. त्यावेळी गल्लीतील रोडवर अर्भकाचे मुंडके पडलेले असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयाने आरोपींना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान आरोपी रतनलाल चौधरी याने अर्भकाचे शरीर शहागंज येथील एका लहान जागेत पुरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष सदरील जागेची तपासणी केली असता मृत अर्भकाचे कोणतेही अवयव पोलिसांना सापडले नाहीत. तसेच आरोपींनी शस्त्राने अर्भकाचे मुंडके धडावेगळे केल्याचे समोर आले. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का? तसेच हा नरबळी किंवा करणीचा प्रकार आहे का? याचा देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

- Advertisement -

हे ही वाचा – अखेर तीन दिवसांनंतर चीनने केली भारतीय जवानांची सुटका!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -