घरताज्या घडामोडीVideo: तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत असतात सडलेले बटाटे!

Video: तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत असतात सडलेले बटाटे!

Subscribe

या भेसळयुक्त पाणीपुरी खाल्ल्यामुळे मुलांना उलट्याचा त्रास झाला. त्यामुळे नागरिक संतापले आणि त्यांनी विक्रेत्याला गाठून मारहाण केली.

अनेकवेळा पाणी पाणीपुरीत भेसळ करीत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा औरंगाबाद मधील टीव्ही सेंटर परिसरातील एका पाणीपुरी विक्रेत्याने भेसळयुक्त पाणीपुरी विकल्यामुळे नागरिकांनी चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही भेसळयुक्त पाणीपुरी खाल्ल्यामुळे काही मुलांना उलट्या झाल्या. त्यामुळे संतप्त नागरिक पाणीपुरी विक्रेत्याला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळेस विक्रेता आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.

मनसे कार्यकर्त्यांनी देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला

हा पाणीपुरी विक्रेता किडक्या आणि सडलेल्या बटाट्यांचा वापर पाणीपुरीसाठी करत होता. यामुळे काही मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी या विक्रेत्याला गाठून त्याला हे सडलेले बटाटे खाण्याचा आग्रह धरला आणि त्याला चोप दिला. तसंच पुन्हा असं करणार नाही अशी ग्वाही विक्रेत्याने हात जोडून दिली आणि माफी मागितली. जरी विक्रेत्याने माफी मागितली असली तरी नागरिकांनी त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच मनसे कार्यकर्त्यांनी देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून घटनेसंदर्भात अन्न व औषधी प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

पाणीपुरी खाताना काळजी घ्या

या अगोदर सुद्धा पाणीपुरीच्या अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणीपुरीची विक्री केली जाते. मात्र ती पाणीपुरी किती शुद्ध किंवा अशुद्ध आहे. त्यात वापरली जाणारी सामग्री कशी आहे याकडे कधी लक्ष दिलं जातं नाही. त्यामुळे आता पाणीपुरी खाताना काळजी घ्या.

पाणीपुरी खाताय तर सावधान! | Aurangabad people beaten panipuri hawkers

पाणीपुरी खाताय तर सावधान! | Aurangabad people beaten panipuri hawkers

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 25, 2020

- Advertisement -

हेही वाचा – आज माथाडी कामगारांचा राज्यव्यापी संप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -