राज ठाकरेंवर अखेर गुन्हा दाखल, औरंगाबाद सभेवरुन पोलिसांची मोठी कारवाई

aurangabad police filed case against Raj Thackeray due to violation rules in rally
राज ठाकरेंवर अखेर गुन्हा दाखल, औरंगाबाद सभेवरुन पोलिसांची मोठी कारवाई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. 1 मे 2022 रोजी राज ठाकरेंनी औरंगाबमध्ये सभा घेतली होती. औरंगाबादच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी अटी घातल्या होत्या एकूण 16 अटींपैकी 12 अटींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. राज ठाकरेंच्या भाषणाची औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता पडताळणी करत होते. कायदेशीर भाग तपासल्यानंतर राज ठाकरेंवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जुन्या प्रकरणांमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना देखील नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभेमध्ये अटींचे उल्लंघन केल्या प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटी किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येणार असा इशारा औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी दिला होता. यानंतर आता औरंगाबाद पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

राज ठाकरेंच्या सभेनंतर पोलिसांनी सर्व डेटा गोळा केला. सभेच्या ठिकाणी पोलिसांकडूनही सीसीटीव्ही लावण्यात आले होते. या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्त आज राज ठाकरेंवर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंवर कलम 116,117,153 ए,135 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद मनसे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबे यांच्यावरसुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे. सभेच्या आयोजकांवरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित खांबे यांच्या घरी पोलिसांचे पथक दाखल झाले होते. त्यांना कारवाईची नोटीस पोलिसांनी दिली आहे. मनसैनिकांनी पोलिसांच्या नोटीसीचे स्वागत केल असल्याची प्रतिक्रिया मनसैनिकांनी दिली आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या भाषणाबाबत आजच कारवाई, राज्यात ३० हजार पोलीस तैनात, पोलीस महासंचालकांची प्रतिक्रिया