घरमहाराष्ट्रऔरंगाबाद जिल्ह्यात १५० कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात १५० कोरोना रुग्णांची वाढ

Subscribe

कोरोना चाचणी करण्यात आलेल्या ९३४ स्वॅबपैकी आज १५० अहवाल पॉझिटिव्ह

कोविड -१९ या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या अनावश्यक हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरातील पोलिसांनी संध्याकाळी ७ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी असताना औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १०२ रुग्ण तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ८५ पुरूष तर ६५ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण ६ हजार ८८० कोरोनाबाधित आढळले आहेत.

तर त्यापैकी ३ हजार ३७४ रुग्ण बरे झालेले असून ३१० जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. या रूग्णांपैकी ३ हजार १९६ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना चाचणी करण्यात आलेल्या ९३४ स्वॅबपैकी आज १५० अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

- Advertisement -

मिळलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मनपा हद्दीत १०१ रुग्ण आढळले असून  घाटी परिसर (१), जाधव मंडी (३), अरिष कॉलनी (३), सिडको एन-११ (३), दिल्ली गेट (१), गजानन नगर (४), पुंडलिक नगर (१), छावणी (२), किराणा चावडी (१), एन 11 हडको, (१), आदर्श कॉलनी गारखेडा (१), नाईक नगर (४), उस्मानपुरा (५), उल्कानगरी (२),शिवशंकर कॉलनी (८), एमआयडीसी, चिखलठाणा (१), मातोश्री नगर (२), नवजीवन कॉलनी (१), श्रध्दा कॉलनी (१), एन-6 (१), एन-२ सिडको, ठाकरे नगर (१), जटवाडा रोड (१), पोलिस कॉलनी (२), दशमेश नगर (७), वेदांत नगर (१), टिळक नगर (१), एन-९ सिडको (१), प्रगती कॉलनी (१), देवळाई, सातारा परिसर (२),जयभवानी नगर (३), अंबिका नगर (१), गजानन कॉलनी (३), पद्मपुरा (१५), सिंधी कॉलनी (१),पडेगाव (२), सिल्क मिल कॉलनी (४), रेल्वे स्टेशन परिसर (४), टिव्ही सेंटर (४), अन्य (४)

ग्रामीण भागात ४९ नवे रुग्ण

विहामांडवा (१), सिध्देश्वर नगर, सुरेवाडी (१), कारंजा (१), वाळुज (१), हिरापुर सुंदरवाडी (३), स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर (२), सावरकर कॉलनी, बजाज नगर (२), वडगांव बजाज नगर (२), निलकमल सोसायटी, बजाज नगर (४), साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर (५), साऊथ सिटी, बजाज नगर (१), दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी (१), सायली सोसायटी बजाज नगर (3), शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी (२), जिजामाता सोसा.बजाज नगर (३), पंचगंगा सोसा. बजाजनगर (१), विश्व विजय सो. बजाजनगर (२), डेमनी वाहेगांव (३), पैठण (३), इंदिरा नगर, वैजापुर (५), अजिंठा (२), शिवणा (१), याभागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये १५ जुलैपर्यंत कर्फ्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -