घरताज्या घडामोडीऔरंगाबादचं नामांतर करावं अशी मागणी - अनिल परब

औरंगाबादचं नामांतर करावं अशी मागणी – अनिल परब

Subscribe

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये मी औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं याबाबत गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. ही मागणी उद्याच्या कॅबिनेट बैठकीत मंजूर करावी. अशी मागणी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी केली आहे. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

कॅबिनेट बैठक संपल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कित्येक वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत हा विषय आणावा आणि मंजूर करावा, अशी विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. वांद्रे पूर्व भागातील जी सरकारी वसाहत आहे त्या वसाहतीतील रहिवाश्यांना तिथेच घरं मिळाली अशी मागणी शिवसेना गेली कित्येक वर्ष करत आहे. म्हणून उद्याच्या बैठकीत हा विषयही घेऊन यावा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळावी, अशी मागणी केल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली.

- Advertisement -

राजकीय पद्धतीचे विषय हे कॅबिनेटमध्ये होत नाहीत. अशा प्रकारच्या बैठकीमध्ये राज्य सरकारची धोरणं आणि त्यासंदर्भातील निर्णय होत असतात, असं परब म्हणाले.

शिवसेनेने ही मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्यामुळे हिंदुत्वासाठीच आम्ही आहोत, असा दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होतोय का?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको, त्यासाठी भाजपासोबत युती करा, अशी मागणी शिंदे गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यामध्ये अनिल परब यांनी आज औरंगाबादचं नामांतर करण्याच्या विषयाला हात घातला असून उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा  : राज्यात लवकरच पोलीस भरती, गृहमंत्र्यांची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -