औरंगाबादेत एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा 19 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत (Aurangabad) घडली आहे. ग्रंथी सुखप्रीत कौर असे या मुलीचे नाव आहे.

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा 19 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत (Aurangabad) घडली आहे. ग्रंथी सुखप्रीत कौर असे या मुलीचे नाव आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) अधिक तपासाला सुरूवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून कॉलेजसमोरून तरुणीला ओढत नेले आणि तिची हत्या केली. औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालय (Devgiri College) परिसरात ही घटना घडली. मृत तरुणी ही विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. दुपारी तरुणी महाविद्यालयाबाहेर आली असता एक तरुण तिथे आला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर तरुणीस कॉलेजसमोरून ओढत नेत तरुणाने तिची चाकूने हत्या केली.

हेही वाचा – कर्तव्याचे सोहळे आता पुरे; गुन्हेगारी रोखायचाही प्रयत्न करा

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. तसेच, शरण सिंग नावाच्या तरुणाने हत्या केल्याची पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी या संशयित आरोपीला अटक करण्यासाठी पथक रवाना केले आहे. हा संपूर्ण प्रकार एकतर्फी प्रेमातून झाला आहे. दरम्यान, 19 वर्षीय मुलीची हत्या झाल्याने तिच्या कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे.

दोन खुनाच्या घटना

औरंगाबादेत आज शहरात खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. देवगिरी महावियालाजवळ तरुणीला ओढत नेत खून, जिन्सी पोलीस स्टेशन हद्दित किरकोळ वादातून एकाचा खून, अशा दोन घटना उघडकीस आल्या आहेत.


हेही वाचा – Good News : मोदी सरकारचा मोठा दिलासा! पेट्रोल ९.५० पैसे, डिझेल लीटरमागे ७ रु. होणार स्वस्त