घरताज्या घडामोडीधक्कादायक : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

धक्कादायक : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

Subscribe

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथे घडली आहे.

देश एकीकडे कोरोना संकटांचा सामना करत आहे. मात्र, दुसरीकडे अशा परिस्थितही अनेक गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ३८ वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना आज, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन तपासाला सुरुवात केली आहे.

नेमके काय घडले?

जवाहरनगर परिसरातील ३८ वर्षीय महिला देशात लॉकडाऊन असताना देखील आज सकाळी संग्रामनगर उड्डाणपुलावर वॉक करत होती. दरम्यान, दुचाकीवरुन आलेल्या तरुणाने अचानक तिला अडवले. नंतर बाजूला दुचाकी उभी केली आणि महिलेच्या अंगावरील कपडे खेचून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या घटनेमुळे महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याचवेळी तेथून गुरुगोविंदसिंहपूरा विभागाचे सहायक आयुक्तालयाच्या कार्यालयात कार्यरत असलेले विजय पवार त्या रस्त्यावरुन आपल्या बहिणीच्या घरी जात होते. ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या ही गोष्ट लक्षात येताच आरोपींनी तात्काळ त्याठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर महिलेला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगण्यात आला. मात्र, महिलेने या घटनेची तक्रार दाखल करण्यास साफ नकार दिला. त्यानंतर पवार यांनी महिलेला घरी नेऊन सोडले. परंतु, या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोटा येथे राज्यातील २००० विद्यार्थी अडकले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -