घरमहाराष्ट्रसख्खा चुलत भाऊ बनला पक्का वैरी; छातीत चाकू भोसकून केली हत्या

सख्खा चुलत भाऊ बनला पक्का वैरी; छातीत चाकू भोसकून केली हत्या

Subscribe

औरंगाबादमध्ये भावानेच शुल्लक कारणावरून चुलत भावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून सख्ख्या चुलत भावांमध्ये चांगलाच वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की त्यामध्ये एकाने तरूणाच्या छातीमध्ये चाकू भोसकून त्याची हत्या केली. ही खळबळजनक घटना औरंगाबाद शहरातील चिखलठाणा येथील ऋषिकेशननगरमध्ये काल, शुक्रवारी रात्री उशिरा घडली.

- Advertisement -

आकाश मारोती शेळके (वय २०) असे खून झालेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश शेळके आणि सचिन दशरथ शेळके हे दोघे सख्ख्ये चुलत भाऊ भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी ऋषिकेशनगर परिसरात आले होते. आकाश हा संजयनगर परिसरात राहत होता. आकाश आणि सचिन यांच्यामध्ये कार्यक्रमात नाचण्यावरून चांगलाच वाद झाला.

वाद एवढा विकोपाला गेला की सचिनने त्याच्याकडे असलेल्या चाकूने आकाशच्या छातीवर वार केले आणि चाकू त्याच्या छातीत भोसकला. गंभीर जखमी झालेल्या आकाश शेळकेचा यामध्ये मृत्यू झाला. काही क्षणातच सचिन तेथून पसार झाला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सिडको एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -