औरंगाबादचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल आग्रहारकर यांची आत्महत्या

aurangabad

औरंगाबाद – शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अनिल आग्रहारकरांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आग्रहारकर हे औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी धमकीच्या कॉलमुळे आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनिल माधवराव आग्रहारकर (वय 55) यांनी उल्कानगरी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण घेतल्यानंतर ते खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सकाळी 8.30 वाजले तरी ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे खोलीत डोकावून पाहिले असता आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आग्रहारकर हे औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे. शहरात त्यांचे अनेक ठिकाणी गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सुरू आहेत. त्यांनी धमकीच्या कॉलमुळे आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आठ ते दहा दिवसांपासून व्यापारातील व्यावहारिक त्रास असल्याची माहिती परिवाराने दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.