घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरअग्निपथ सैन्य भरतीदरम्यान चक्कर येऊन कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

अग्निपथ सैन्य भरतीदरम्यान चक्कर येऊन कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

Subscribe

औरंगाबाद येथे सुरु असलेल्या अग्निवीर सैन्य भरतीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अग्निवीर योजनेंतर्गत सैन्य दलाची भरती औरंगाबाद येथे सुरू होती. या भरतीसाठी तरून कन्नड तालुक्यातून आला होता. सोळाशे मिटरचा फेरा पूर्ण करताना तो चक्कर येऊन कोसळला होत. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कन्नडतालुक्यातील विठ्ठलवाडी येथील करण नामदेव पवार (वय20) हा अग्निवीर योजनेंतर्गत सैन्य भरतीसाठी औरंगाबादला आला होता. मंगळवारी रात्री 1 वाजता 1600 मिटर रनींग करताना शेवटाचा राऊंड काढत असताना तो चक्कर येवून पडला. यानंतर त्याला शासकीय घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार चालू असतांना आज दुपारी त्याचे निधन झाले आहे.

- Advertisement -

6 महिन्यापूर्वी आईचे निधन –

करणची कौटुंबिक अर्थिक परिस्थिती  जेमतेम होती. आई सतत आजारी राहत असल्याने स्वतः स्वयंपाक करून आई आणि भावाला जेवू घालत होता. दरम्यान सहा महिन्यापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते. सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करावी अशी त्याची इच्छा होती. यासाठी तो 6 वर्षे सराव करत होता.

- Advertisement -

नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी –

करण काल रात्री चक्कर येऊन पडल्याची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक कन्नडहून औरंगाबादमध्ये आले. मात्र, आज दुपारी त्याच्या निधनाची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि मित्रपरिवार घाटी रुग्णालयात आल्याचे पाहायला मिळाले. सैन्यात भरती होण्याची करणची खूप इच्छा होती. त्यासाठी गेली अनेक दिवस तो सराव करत होता.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -