घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरएसटीचा प्रवास पण पावसात भिजत, पाहा काय आहे प्रकरण?

एसटीचा प्रवास पण पावसात भिजत, पाहा काय आहे प्रकरण?

Subscribe

परभणी – परभणी आगारातील परभणी – कुंभारी बस सोमवारी रात्री ७ वाजता कुंभारीकडे निघाली. मात्र, वाटेत पाऊस सुरू झाला. यामुळे बसमधील जवळपास 26 प्रवाशांना बसमध्ये छत्र्या उघडून 23 किमीचा प्रवास करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

परभणी आगारातून रोज 54 बसेस धावतात. या बसेसमधून 10 हाजर प्रवासी रोज प्रवास करतात. यातून परभणी आगाराला 18 लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, या आगारातील बहुतांश बस मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक प्रवाशांनी प्रशासनाला बस नादुरुस्तीबाबत कल्पना दिली. मात्र, यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यातच सोमवारी रात्री 7 वाजता परभणी आगारातून कुंभारीकडे निघालेली बस शहापूरपर्यंत पोहोचली. मात्र, पाऊस सुरू झाल्याने बसला गळती लागली. त्यामुळे प्रवासांना छत्रीचा सहारा घ्यावा लागला.

- Advertisement -

दिवसभरात 13 फेऱ्या  होणाऱ्य मार्गावर नादुरुस्त बस –

परभणी आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गामध्ये परभणी – कुंभारी या मार्गाचा समावेश आहे. परभणी आगारातून या मार्गावर १३ फेऱ्या दिवसभरात होतात. त्यातून चांगले उत्पन्नही आगाराला मिळते. परभणी आगारात गोल्डन रुट म्हणून पाहिले जात असताना या मार्गावर नादुरुस्त बस पाठविल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -