शिंदे गटातील रमेश बोरणारेंचा चंद्रकांत खैरेंना फोन, मध्यस्थीची केली मागणी

Ramesh Boranare from Shinde group called Chandrakant Khaire and demanded mediation

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारण मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेच्या 42 आमदारांसह तब्बल 50 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर शिंदे यांच्यासोबत असलेले काही आमदार परतण्यास इच्छूक आहेत. त्यांना फसवून गुवाहाटीला नेण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांना रमेश बोरणारे यांचा फोन आला होता. यावेळी खैरे यांनी मध्यस्थी करण्याची मागणी त्यांनी केली

खैरेंकडून चौकशी –

खैरे यांनी बोरणारेंची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तुम्ही कधी येणार आहात, मी तुम्हाला उद्धवसाहेबांकडे घेऊन जातो, असे चंद्रकांत खैरे बोरणारेंना म्हणाले. तेव्हा बोरणारे यांनी खैरेंकडे मध्यस्थी करण्याची मागणी केली. तेव्हा खैरे यांनीही त्यांची मागणी मान्य केली. खैरे यांनी तिकडे काही चालले आहे, असा प्रश्नही विचारला. तेव्हा बोरणारे म्हणाले की, काही नाही चहा नाष्टा गप्पा असे सुरु आहे. तेव्हा खैरे यांनीही मस्करीच्या सुरात चहा, नाष्टा, रात्री ऑर्केस्ट्रा वगैरे काही सुरु आहे का? असं विचारले. तेव्हा नाही साहेब असं काही नाही, असं बोरणारे यांनी सांगितले.

 खैरे म्हणतात तुम्ही या तरी –

खडसे पुढे म्हणाले की हॉटेलचे जेवण किती दिवस करणार? पोट बिघडते हॉटेलच्या जेवणाने. तेव्हा बोरणारेही हसले. तसेच मध्यस्ती करा अशी मागणी त्यांनी केली. तेव्हा खैरे म्हणाले की तुम्ही या, मी तुमच्यासाठी मध्यस्ती करतो. मी तुम्हाला घेऊन जातो उद्धव साहेबांकडे. कितीजण येणार तुम्ही सांगा? असे खैरे यांनी विचारले. तेव्हा सगळ्यांसाठीच मध्यस्ती करा, असे बोरणारे म्हणाले. त्यावेळी सगळ्यांसाठी नाही आता आपल्या जिल्ह्यातील किती आमदार येता ते सांगा, मी करतो मध्यस्ती, असा विश्वास खैरे यांनी बोरणारे यांना दिला.