औरंगजेब कबर ते आदित्य ठाकरेंपर्यंत राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

संभाजीनगरचं नामांतर झालं काय आणि नाही झालं काय? मी बोलतोय ना.. आरे पण तू कोण आहे? तु कोण सरदार पटेल की महात्मा गांधी आहे. मी बोलतोय ला काय लॉजिक आहे. केंद्रात सत्ता होती नामांतराचा प्रश्न मिटवला का, कारण तो प्रश्न सतत जिवंत ठेवून त्यावरुन मत मिळवायची आहेत, असंही राज ठाकरे म्हणालेत.

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगजेब कबरीपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्व आणि संजय राऊत या विषयांना हात घालून जोरदार पलटवार केला आहे. पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंचावर राज ठाकरेंनी सभा झाली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला आहे.

राज ठाकरेंच्या सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

>> एसपी कॉलेजच्या लोकांनी सभेसाठी नकार दिला, आता आम्हाला नाही तर कोणालाच नाही. मग काय नदीपात्राचा विषय झाला. हवामान पाहता कोणत्याही वेळेला पाऊस पडेल अशी चिन्हे दिसतायत. निवडणुका नाहीत, मग काही नाही उगाच कशाला भिजत भाषण करा. मग मी यांना सगळ्यांना सांगितलं, गणेश कला क्रीडा सभा घेऊ, निवडणुकांना वेळ आहे.

>> मी सांगितलं मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा लावा. राणा दाम्पत्य उठलं आणि त्यांनी हनुमान चालिसा मातोश्रीवर म्हणण्याचा हट्ट केला. अरे मातोश्री काय मशिद आहे का? त्यांना आत टाकलं. मधू इथे अन् चंद्र तिथे, त्यानंतर एकत्रं आले. मग त्यांना सोडण्यात आलं. सेनेकडून वाटेल ते बोलण्यात आलं. तेही बोलले. एवढा राडा पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि राऊत जेवताना दिसले. शिवसेनेतील पदाधिकारी लोकांना काही वाटतच नाही.

>> पुण्यात आल्यानंतर थोडंसं माझं पायाचं दुखणं चालू आहे. त्या पायामुळे कमरेचं दुखणं चालू होतं. त्यामुळे 1 तारखेला हिकबोनचं ऑपरेशन करणार आहे. पत्रकारांनी उगाच नको तो अवयव बाहेर काढण्याआधी म्हटलं आपणंच सांगावं, कोणत्या अवयवाचं ऑपरेशन आहे ते.. कारण हॉस्पिटलमध्ये गेलो तर कोणकोणते अवयव बाहेर काढतील सांगता येत नाही

>> मागच्या सभेत मी सांगितले होते की पंतप्रधानांना विनंती आहे की लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी अजून एक कायदा आणावा आणि तिसरी विनंती म्हणजे औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजीनगर हे नाव बदलून टाका. संभाजीनगरचं नामांतर झालं काय आणि नाही झालं काय? मी बोलतोय ना.. आरे पण तू कोण आहे? तु कोण सरदार पटेल की महात्मा गांधी आहे. मी बोलतोय ला काय लॉजिक आहे. केंद्रात सत्ता होती नामांतराचा प्रश्न मिटवला का, कारण तो प्रश्न सतत जिवंत ठेवून त्यावरुन मत मिळवायची आहेत.

>> शरद पवरांना सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार, तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलत आहात. यांचे हे जे सगळ राजकारण तुम्ही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी हे राजकारण करणार, कोणी कोणाला भेटतय काय चाललंय असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

>> उद्धव ठाकरेंनी एकच सांगावं, एकतरी केस आहे का ओ तुमच्या अंगावर आहे का? कोणतीच भूमिका घ्यायची नाही. मराठा नाहीतर मराठी समाजासाठी केलेल्या आंदोलनामुळे एकतरी केस तुमच्यावर आहे का? असे राज ठाकरे म्हणाले आहेत. १९९२ -९३ ला दंगल झाली आणि त्यावरुन संभाषण सुरु करायचे असा टोलासुद्धा राज ठाकरेंनी लगावला आहे.

>> 2017 मध्ये यूपी-बिहारमधील तरुणांनी गुजरातेत येऊन गुजराती मुलीवर बलात्कार केला. या मंडळीला गुजरातेतून हुसकावून लावण्यात आले, उत्तरेत कुणी आश्रय दिला नाही, आता याबाबत कोण माफी मागणार? अर्थातच, नंतर ही बलात्कार करणारी मंडळी “आओ जाओ घर तुम्हारा” असलेल्या महाराष्ट्रात आश्रयाला आली.

>> छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीसाठी फंडिंग सुरू आहे. त्यावर महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा आहे, याचं आश्चर्य वाटतं. कोण आहेत त्यासाठी फंडिंग करणाऱ्या अवलादी?
यातून या घुसखोरांची हिंमत वाढते. “ते” फक्त टेस्ट करतात आणि काही दिवस गेल्यावर पुन्हा “त्यांचे” उद्योग सुरू करतात. इतिहासात पहिल्यांदा सकाळच्या अझान बंद झाल्या आहेत. जवळपास ९२ ते ९२ टक्के ठिकाणी आवाज कमी झाले आहेत. परंतु माझी मागणी लाऊडस्पीकर काढण्याची आहे. तुम्ही वेंधळ्यासारखे राहिले तर ही माणसे आणखी आत घुसणार आहेत. यांना माहिती आहे थोडं चिडणार आणि नंतर महाराष्ट्र थंड राहणार आहे.

>> एमआयएम सतत हिंदूंविरोधात बोलत राहिली पाहिजे, ज्यातून यांची रोजीरोटी चालेल. यांच्या लक्षात आलं नाही की आपण एक राक्षस वाढवतोय. म्हणता म्हणता यांच्या राजकारणात एमआयएमचा खासदार झाला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीसाठी फंडिंग सुरू आहे. त्यावर महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा आहे, याचं आश्चर्य वाटतं, असंही राज ठाकरे म्हणालेत.

>> काल शिवसेनेतलं कुणी तरी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. अरे तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावलाय.


हेही वाचाः मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला आलेल्यांबरोबर तुम्ही जेवताय?, राज ठाकरेंचा राऊतांना टोला