Homeमहाराष्ट्रMarriage Auspicious Time : लगीनघाई करणाऱ्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात मुहूर्तांची रीघ

Marriage Auspicious Time : लगीनघाई करणाऱ्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात मुहूर्तांची रीघ

Subscribe

तुम्ही जर पुढील महिन्यात लग्नाचा विचार करत असाल, तर जाणून घेऊया रोमँटिक महिन्यात लग्नाचे शुभ मुहूर्त किती आहेत.

मुंबई : दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे. प्रेमी जोडपे या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. महत्त्वाचे म्हणजे या रोमँटिक महिन्यात अनेकजण लग्नही करतात. मात्र लग्नासारखे शुभ कार्य हे केवळ शुभ मुहूर्तावर करायचे असतात. त्यामुळे तुम्ही जर पुढील महिन्यात लग्नाचा विचार करत असाल, तर जाणून घेऊया रोमँटिक महिन्यात लग्नाचे शुभ मुहूर्त किती आहेत. (Auspicious times in February for those rushing to get married)

हिंदू धर्मात विवाह सोहळ्याकडे पवित्र संस्कार म्हणून पाहिले जाते. यासाठीच विवाह सोहळा हा वैदिक मंत्र आणि अनेक परंपरांच्या माध्यमातून संपन्न केले जाते. महत्त्वाचे म्हणजे हिंदू धर्मात ब्रह्म विवाह, दैव विवाह, आर्ष विवाह, प्रजापत्य विवाह, असुर विवाह, गंधर्व विवाह, राक्षस विवाह, पैशाच विवाह हे आठ प्रकार विवाहाचे मानले जातात. या विवाहांपैकी ब्रह्म विवाहाला सर्वोत्तम मानले जाते, तर पैशाच विवाहाला सर्वात कमी मानले जाते. त्यामुळे आजच्या काळातही प्रत्येकजण शुभ मुहूर्तावर विवाह करण्यास प्राधान्य देताना दिसतात. चला तर जाणून घेऊन विवाह इच्छुकांसाठी फेब्रुवारी महिन्यात किती शुभ मुहूर्त आहेत.

हेही वाचा – Necklace Designs : गोल नेक ब्लाउज आणि सूटसाठी स्पेशल नेकलेस डिझाई्न्स

फेब्रुवारी महिन्यात 15 शुभ मुहूर्त

  • 2 फेब्रुवारी (रविवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – सकाळी 09 वा. 14 मिनिटांपासून ते 03 फेब्रुवारी रोजी सकाळी 07 वा. 08 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : उत्तर भाद्रपद, रेवती
    तिथी : पंचमी
  • 3 फेब्रुवारी (सोमवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – सकाळी 07 वा. 08 मिनिटांपासून ते सायंकाळी 05 वा. 40 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : रेवती
    तिथी : षष्ठी
  • 6 फेब्रुवारी (गुरुवार) 2025
    शुभ मुहुर्त वेळ – सायंकाळी 07 वा. 29 मिनिटांपासून ते 07 फेब्रुवारी रोजी सकाळी 07 वा. 06 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : रोहिणी
    तिथी : नवमी, दशमी
  • 7 फेब्रुवारी (शुक्रवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – सकाळी 07 वा. 06 मिनिटांपासून ते सायंकाळी 04 वा. 17 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : रोहिणी
    तिथी : दशमी
  • 12 फेब्रुवारी (बुधवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – मध्यरात्री 01 वा. 58 मिनिटांपासून ते 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 07 वा. 01 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : मघा
    तिथी : प्रतिपदा
  • 13 फेब्रुवारी (गुरुवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – सकाळी 07 वा. 01 मिनिटांपासून ते सायंकाळी 07 वा. 31 मिनिटांपर्यं
    नक्षत्र : मघा
    तिथी : प्रतिपदा
  • 14 फेब्रुवारी (शुक्रवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – रात्री 11 वा. 09 मिनिटांपासून ते 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 06 वा. 59 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी
    तिथी : तृतीया
  • 15 फेब्रुवारी (शनिवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – सकाळी 06 वा. 59 मिनिटांपासून ते रात्री 10 वा. 48 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी
    तिथी : तृतीया
    दुसरा मुहूर्त : रात्री 11 वा. 52 मिनिटांपासून ते 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 06 वा. 59 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी, हस्त
    तिथी : चतुर्थी
  • 16 फेब्रुवारी (रविवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – सकाळी 06 वा. 59 मिनिटांपासून ते सकाळी 08 वा. 06 मिनिटांपर्यं
    नक्षत्र : हस्त
    तिथी : चतुर्थी
  • 18 फेब्रुवारी (मंगळवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – सकाळी 09 वा. 52 मिनिटांपासून ते 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 06 वा. 56 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : स्वाती
    तिथी : षष्ठी
  • 19 फेब्रुवारी (बुधवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – सकाळी 06 वा. 56 मिनिटांपासून ते सकाळी 07 वा. 32 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : स्वाती
    तिथी : सप्तमी, षष्ठी
  • 21 फेब्रुवारी (शुक्रवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – सकाळी 11 वा. 59 ते दुपारी 2 वा. 54 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : अनुराधा
    तिथी : नवमी
  • 23 फेब्रुवारी (रविवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – दुपारी 01 वा. 55 ते संध्याकाळी 06 वा. 43 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : मूल
    तिथी : एकादशी
  • 25 फेब्रुवारी (मंगळवार) 2025
    शुभ मुहूर्त वेळ – सकाळी 08 वा. 15 मिनिटांपासून ते संध्याकाळी 06 वा. 31 मिनिटांपर्यंत
    नक्षत्र : उत्तराषाढ
    तिथी: द्वादशी, त्रयोदशी