श्रीवर्धनमध्ये एके-47 सह आढळलेली संशयित बोट ऑस्ट्रेलियन महिलेची; विधानसभेत फडणवीसांची माहिती

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये २ ते ३ एके-47 आढळली आहेत. रायगडमधील हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे.

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये २ ते ३ एके-47 आढळली आहेत. रायगडमधील हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. ही बोट ऑस्ट्रेलियामधील आहे. ऑस्ट्रेलियाच्या हाना लॉंडर्न्स गन यांच्या मालकीची आहे. लेडी हार्न असे या बोटीचे नाव आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. (Australian women suspected boat  AK-47 in Shrivardhan Information DCM devendra Fadnavis Maharashtra Assembly Monsoon Session)

“रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील किनाऱ्यावर मच्छिमारांना संशयास्पद बोट आढळली. त्यानंतर मच्छिमारांनी स्थानिक पोलिसांना या बोटीच्या संदर्भात माहिती दिली. या बोटीची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यामध्ये २ ते ३ एके-47 रायफल, दारुगोळा आणि बोटी संदर्भातील कागदपत्रे सापडली. या घटनेची माहिती मिळताच किनारपट्टीवर नाकाबंदी करत रायगड जिल्ह्याला हायअलर्टचे आदेश देण्यात आले. त्यानंतर भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती देण्यात आली”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीचे नाव लेडी हार्न असे आहे. तसेच, ही बोट ऑस्ट्रेलियामधील आहे. ऑस्ट्रेलियाच्या हाना लॉंडर्न्स गन यांच्या मालकीची आहे. या ऑस्ट्रेलियन महिलेचे पती जेम्स हार्बट या बोटीचे कॅप्टन आहेत. ही बोट मस्कतहून युरोपच्या दिशेने जात होती. २६ ६ २०२२ रोजी या बोटीचे इंजिन खराब झाल्याने खलाश्यांनी मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर एक वाजताच्या सुमारास एका कोरीयन युद्ध नौकेने खलाश्यांची सुटका केली. त्यांनतर त्यांना ओमानला सुपूर्द केले”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“समुद्र खवळलेला असल्याने या बोटीचे टोव्हींग करता आले नाही. तसचे, समुद्राच्या लाटांमुळे ही बोट हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्याला लागल्याची माहिती भारतीय कोस्ट गार्डने दिली. या घटनेची माहिती मिळताच दहशतवादी पथक आणि स्थानिक पोलीस या बोटीची अधिक तपासणी करत आहेत. तसेच, येत्या काळात उत्सव असल्याने या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

या संदर्भात माहिती मिळाली असली तरी, कुठेही कोणतीही दुर्घटना घडू नये, या पार्श्वभूमीवर सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच, सण असल्याने पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील हरीहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.


हेही वाचा – ‘नशीब आमच्या भाषणावर जीएसटी लावला नाही’; छगन भुजबळांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला