घरमहाराष्ट्रफळ पिकांच्या स्वयंचलित ठिबकसाठी आता मिळणार 'एवढे' अनुदान; केंद्राने दाखवला हिरवा झेंडा

फळ पिकांच्या स्वयंचलित ठिबकसाठी आता मिळणार ‘एवढे’ अनुदान; केंद्राने दाखवला हिरवा झेंडा

Subscribe

धनंजय मुंडे हे मागील महिन्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते.

मुंबई : अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले. मुंडेंनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला आणि तत्परतेने संपूर्ण देशात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित झाले! धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल निवेदनकर्त्या शेतकऱ्यासह असंख्य शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. (Automatic drip irrigation of fruit crops will now receive Edtha subsidy The center showed the green flag)

धनंजय मुंडे हे मागील महिन्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी यावेळी त्यांना निवेदन दिले होते. संत्रा फळ पिकाची गळती सुरु झाली असून, फळबागांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे केली होती.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा आढावा घेत असताना पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेत काही सुधारणा सुचवल्या होत्या. धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला. केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे.

हेही वाचा : MLA DISQUALIFICATION : ठाकरे गटाचे प्रतोद प्रभूंची उलट तपासणी; अवघड प्रश्नांना दिले सोपे उत्तरं

- Advertisement -

निकषानंतर केली जाणार अमलबजावणी

कृषी विद्यापीठातील तज्ञ, स्वयंचलित क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, अनुभवी शेतकरी यांची एक समिती याबाबतचे निकष निश्चित करणार असून या अहवालानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हेही वाचा : पाणी, आरक्षण, रुग्णालयातील मृत्यू अन् बरच काही…; मराठवाडाच का धुमसतोय?

याआधीही घेतला होता शेतकरी हिताचा निर्णय

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर शेतकरी सचिन अग्रवाल यांनी याबाबत एक पत्र लिहून धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. याआधीही मुंडे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत संत्रा कलमासाठी प्रति कलम 70 रुपये प्रमाणे अनुदान तसेच सेंद्रिय आणि रासायनिक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता फळ पिकांसाठी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

निवेदनाचे फलित…

एका सामान्य शेतकऱ्याच्या निवेदनाची कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यालयाने दखल घ्यावी. त्यातून एखादी योजना राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना लागू व्हावी, हे उदाहरण म्हणजे आदर्श ठरावे असेच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -