घरताज्या घडामोडीAvinash Bhosale Arrested : डीएचएफएल प्रकरणात अविनाश भोसले यांना CBI कडून अटक

Avinash Bhosale Arrested : डीएचएफएल प्रकरणात अविनाश भोसले यांना CBI कडून अटक

Subscribe

डीएचएफएल (DHFL) प्रकरणात तीनशे कोटींपेक्षा जास्तची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale Arrested) यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरात CBIने छापेमारी केली होती, त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांना येस बॅंक आणि डीएचएफएल बॅंक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी अटक केली. मागील काही दिवसांपासून अविनाश जाधव यांच्या शोधामध्ये सीबीआय होती. सीबीआयने मुंबई आणि पुण्यातील काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुद्धा केलं होतं. त्यानंतर अविनाश जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर सीबीआयने छापेमारी केली होती. मात्र, आता भोसलेंना अटक करण्यात आली असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

- Advertisement -

यापूर्वी देखील ईडीने फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. परदेशात त्यांनी जी गुंतवणूक केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्यात आली होती. मात्र, सीबीआयने देखील त्यांच्या घरी आणि आजूबाजूच्या परिसरात छापेमारी केली होती.

जून २०२१ मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल ४० कोटी ३४ लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. परंतु भोसले यांच्यासोबत अजून त्यांच्या काही सहकार्यांचा सहभाग आहे का, याबाबत देखील सीबीआय चौकशी करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अविनाश भोसलेंचं महाविकास आघाडी सरकारशी कनेक्शन काय?

अविनाश भोसले कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये अविनाश भोसले यांचे चांगले संबंध असल्याचं बोललं जातंय. पुणे आणि मुंबई बांधकाम उद्योगात अविनाश भोसले यांचं मोठं नाव आहे.


हेही वाचा : अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील ४ कोटींची संपत्ती जप्त


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -