घरमहाराष्ट्रअविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील ४ कोटींची संपत्ती जप्त

अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील ४ कोटींची संपत्ती जप्त

Subscribe

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ईडीने मोठा झटका दिला आहे. भोसलेंची तब्बल ४ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पुण्यातील अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL) या कंपनीची जागा ईडीने जप्त केली आहे. या जमिनीची किंमत चार कोटी रुपये एवढी आहे. पुण्यातील सरकारी जागेवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही जमीन पुण्यातील गणेशखिंड रोडवरील रेंज हिल कॉर्नरमधील प्लॉट नंबर २, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत स्थित आहे.

परकिय चलन गैरव्यवहार प्रकरणात अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली. अविनाश भोसलेंनी पुण्यातील एक एकर जागेवर बांधकाम केलं आहे. ती जमीन सरकारी आहे. यामुळे भोसलेंविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला. दरम्यान, आज ईडीने अविनाश भोसले यांची चार कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

- Advertisement -

भोसलेंची ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जाते. भोसले कुटुंबीयांची पुणे, नागपूर, गोवा परिसरात तारांकित हॉटेल्स आहेत. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली होती. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात ईडीने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. भोसले यांची ईडीकडून ‘फेमा’(फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट १९९९) कायद्यान्वये सप्टेंबर २०१७ पासून चौकशी सुरू होती.

तसंच ईडीने फेमा कायद्यांतर्गत कारवाई करत भोसले यांना १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७ मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्युटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी सुरू होती.

- Advertisement -

अविनाश भोसले यांची पुण्यातील कोरेगाव पार्क भागात हॉटेल वेस्टीन, गोव्यात हॉटेल डब्ल्यू रिट्रिट अँड स्पा, नागपूरमध्ये हॉटेल ल मेरेडियन ही तारांकित हॉटेल्स आहेत. दुबईतील रोशडेल असोसिएट्स लिमिटेड या कंपनीत भोसले कुटुंबीयांची गुंतवणूक आहे. परदेशातील बँकांमध्ये खाती आहेत. परकीय चलन व्यवहारात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, ईडीने भोसले यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील कार्यालयातही काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती.

कोण आहेत अविनाश भोसले?

रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे. त्यानंतर त्यांनी कृष्णा खोरे महामंडळातील कामांचे ठेके मिळविले. सर्वपक्षीय सलगी असलेल्या भोसले यांनी त्यानंतर मोठी व्यवसायवृद्धी केली. कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -