घरठाणेAwhad Vs Paranjape : अजित पवारांवर टीका करणाऱ्या आव्हाडांना परांजपेंचे प्रत्युत्तर

Awhad Vs Paranjape : अजित पवारांवर टीका करणाऱ्या आव्हाडांना परांजपेंचे प्रत्युत्तर

Subscribe

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण या घटनेवरून बोध घेऊन, ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षातील असलेला अंतर्गत तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, असे मत आनंद परांजपेही त्यांनी व्यक्त केले.

ठाणे :  बारामतीकरांनी भावनिक न होता विकासासाठी मतदान करा, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अर्थाचा अनर्थ केला आहे, असा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्त, ठाणे आणि पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. जितेंद्र आव्हाडा यांनी शरद पवार यांच्या मृत्यूबाबत विधान करुन, ध चा मा करत, खोटे बोल पण रेटून बोल अशापद्धतीने अजित पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांच्या निरोगी आरोग्याची आम्ही नेहमी कामना करत आहोत, असेही आनंद परांजपेंनी सांगितले.

आनंद परांजपे म्हणाले, “शरद पवार यांनी कृषी मंत्री म्हणून देशात केलेल्या कार्याचे कौतुक आहेच त्याचबरोबर गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या अजित पवार यांनी 288 मतदारसंघातील लोकांमध्ये आदराची भावना कायम आहे. अनेक आमदार अजित पवार निवडून आणले आहेत. पण डॉ. जितेंद्र आव्हाड यांना आपल्या मतदारसंघाबाहेर कोणी ओळखत नाही आणि येत्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येण्याचीही शक्यता नाही. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरुन टीका करणाऱ्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर रिदा रशीद या महिलेवरील विनयभंगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर उद्वेगाने राजीनामा देताना त्यांनी आपला राजीनामा सभापती किंवा उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे न देता तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला होता, हे डॉ. जितेंद्र आव्हाड सोईस्कर विसरलेले दिसतात, असा टोलाआनंद परांजपे यांनी लागवला.

- Advertisement -

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण या घटनेवरून बोध घेऊन, ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षातील असलेला अंतर्गत तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, असे मत आनंद परांजपेही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – Ulhasnagar Firing Case : गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिंदे गटाच्या मंत्र्यांची मागणी

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा जिंकणे अत्यंत महत्त्वाच्या

गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण ठाणे जिल्ह्यात खासकरुन शिवसेना व भाजपा यांच्यात अंतर्गत धुसफुस असल्याचे या घटनेने उघड केले आहे. ठाण्यातही भाजप आमदार संजय केळकर व शिवसेना नेते यांच्यात सतत अंतर्गत तणावाचे दर्शन घडत असते तर हाच प्रकार मिरा-भाईंदर, नवीमुंबई, कल्याण, उल्हासनगर आदी ठिकाणी, ठाणे जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वारंवार दिसून आलेला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच निघणार आहे, देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील तीनही जागा जिंकणे महत्वाचे आहे. अशावेळी, मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील घटक पक्षातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन महायुतीतील पक्षांतील तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -