Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रBaba Adhav : तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन; ठाकरेंच्या उपस्थितीत बाबा आढावांनी सोडले...

Baba Adhav : तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन; ठाकरेंच्या उपस्थितीत बाबा आढावांनी सोडले उपोषण

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयंत पाटील हे बाबा आढाव यांच्या भेटीला गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर बाबा आढाव यांनी आपले उपोषण सोडले आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुती निवडून आल्यापासून विरोधकांनी एकच मुद्दा लावून धरला आहे, तो म्हणजे ‘ईव्हीएम’. याच ‘ईव्हीएम’विरोधात ज्येष्ठ समाजसुधारक बाबा आढाव हे गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश उपोषणाला बसले होते. त्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते पदाधिकारी त्यांना भेट देत आहे. आज शरद पवार आणि अजित पवार यांनी भेट घेतली. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयंत पाटील हेही बाबा आढाव यांच्या भेटीला गेले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर बाबा आढाव यांनी आपले उपोषण सोडले आहे. (Baba Adhav ends hunger strike after drinking water at the hands of Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे म्हणाले की, बाबा आढाव हे प्रेरणा देणारे आहेत आणि प्रेरणा ही कधीही म्हातारी होऊ शकत नाही. वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते आणि हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे. योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या घोटाळ्यात एक मोठा विषय ईव्हीएमचा सुद्धा आहे. माझे मत कोठे जाते हे समजायला हवे. शेवटच्या एका तासात 76 लाख मते का वाढली? एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही? बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजाअर्चा करण्यासाठी का जातायत? अमावस्येला पूजाअर्चा करण्यासाठी गेलेत यावरून त्यांची मानसिकता दिसून येते‌‌. परंतु महाराष्ट्र लेचापेचा नाही. महाराष्ट्र देशाला दिशा देईल. महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील. त्यामुळे मी बाबा आढाव यांना त्यांचे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती करतो. उद्धव ठाकरेंच्या मागणीनंतर बाबा आढाव यांनी त्यांच्या हाताने पाणी पीत आपले आंदोलन मागे घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : …म्हणून बाबा आढावांच्या भेटीला जिंकलेले आणि हरलेले सुद्धा येतायत; ठाकरेंनी सांगितलं कारण

बाबा आढाव का करत होते उपोषण?

पुण्यातील फुले वाड्यात आंदोलन करणाऱ्या बाबा आढाव यांनी  माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निर्णय वेगळा कसा लागतो? ‘ईव्हीएम’ आणि ‘पैशांच्या’ वापरामुळे हा निकाल आला आहे. या निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली आहे. यासाठी मी आत्मक्लेश आंदोलन करत आहे, अशी माहिती बाबा आढाव यांनी आंदोलनाला बसताना दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? अजितदादांचा बाबा आढाव यांना थेट प्रश्न


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -