बाबा ओरडतील म्हणून आला नाही, अमेय खोपकरांचा आदित्य ठाकरेंवर खोचक टोला

या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमेय खोपकर यांनी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

amey khopkar and aditya thackeray

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून शिवसेनेतील अनेक मंत्री शिंदे गटात सामिल झाले आहेत. अवघे चार मंत्री शिवसेनेत उरले असून तेही शिंदे गटात जाणार का याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमेय खोपकर यांनी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. (Baba didn’t send me, Ameya Khopkar slapped Aditya Thackeray)

शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर दिली होती. पण, “बाबा ओरडतील” म्हणून नाही आला.’ असं ट्विट करून अमेय खोपकरांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून ट्विटरवॉर रंगताना दिसत आहे. अमेय खोपकर यांनी केलेल्या आधीच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘आसामच्या चहासाठी सामंत डेअरीचं दूध. सेनेच्या मानगुटीवर नाराजीचं भूत. कोटीच्या कोटी चार्टर्ड उड्डाणे. विश्वप्रवक्त्यांचे तेच तेच रडगाणे. पोकळ धमक्यांना भीक कोणी घालेल का? छाती फुगवून बेडकाचा बैल होईल का?


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर अमेय खोपकर चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी एकापाठोपाठ अनेक ट्विट केले असून त्यांनी सेना नेतृत्वावर टीका केली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंचा गट आता मनसेमध्ये सामिल होणार असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदेंनी कालपासून राज ठाकरे यांना आतापर्यंत दोनवेळा फोन केला आहे. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या तब्येतीचीही विचारपूस करण्यात आली. दरम्यान, या फोनवरील चर्चेमुळे राज्यातील समिकरण बदलणार असल्याचं सांगण्यता येतंय.