घरताज्या घडामोडीराष्ट्रपतीपद निवडणूक : नितीन राऊतांच्या मतदानावर लोणीकरांचा आक्षेप

राष्ट्रपतीपद निवडणूक : नितीन राऊतांच्या मतदानावर लोणीकरांचा आक्षेप

Subscribe

राष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्या मतदानावर भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी आक्षेप घेतला आहे. नितीन राऊतांनी रांग मोडून मतदान केल्याचा आरोप बबनराव लोणीकरांनी केला आहे.

बबनराव लोणीकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी माझा पहिला नंबर होता. आम्ही एक तास रांगेत उभे राहिलो. मात्र, राज्याचे माजी ऊर्जा नितीन राऊत हे अर्धा तास मध्ये जाऊन बसले होते. माझं मतदान पहिलं असताना राऊत यांनी पहिलं मतदान केलं. त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यांना मध्ये जाऊन बसता येत नाही. त्यामुळं त्यांचं मतदान रद्द करण्यात यावं. अशी तक्रार मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे,

- Advertisement -

भाजपच्या आमदारांनी साडेनऊ वाजेपासून मतदान करण्यासाठी हजेरी लावली होती. परंतु राऊत यांनी रांगेत मतदान न केल्याचा आरोप लोणीकरांकडून केला आहे. यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या ६४ आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केलं आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दोन अपक्षांनी सुद्धा मतदान केलं आहे. आज मतदान झाल्यानंतर २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ज्यांना मतं फुटण्याची भीती, ते आमदारांना बसमधून आणतायतं; पटोलेंची भाजपवर टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -