घरमहाराष्ट्र'या' मंत्र्याने पाहिला 'बिग बीं'चा २२ दिवस सिनेमा

‘या’ मंत्र्याने पाहिला ‘बिग बीं’चा २२ दिवस सिनेमा

Subscribe

राज्यातील मंत्रीदेखील महानायक अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते आहेत. याचे उदाहरण मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहे. एका कार्यक्रमामध्ये लोणीकर यांनी बिग बींच्या संबंधीचे अनुभव मांडले आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांचे अनेक चाहते देशात आणि देशाच्या बाहेरदेखील आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रातील मंत्री मडळातही असे एक मंत्री आहेत, जे नुसते अमिताभ बच्चन यांचे चाहतेच नाहीत तर ते चक्क अमिताभ बच्चन यांची स्टाइलदेखील फॉलो करतात. विशेष म्हणजे या मंत्री महोदयांनी बच्चन यांचा चित्रपट एक-दोन दिवस नाही. तर तब्बल २२ दिवस सिनेमा पाहिला आहे. आता तुम्ही म्हणाल बिग बी यांचे चाहते असलेले हे मंत्री महोदय आहेत तरी कोण… तर या मंत्री महोदयांचे नाव आहे बबनराव लोणीकर. ज्यांच्याकडे सध्या राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खाते आहे. आज, बुधवारी केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘दरवाजा बंद पार्ट २.०’ अभियानाचा शुभारंभ पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी लोणीकर यांनी ही माहिती दिली.

वाचा – राष्ट्रीय पेयजल योजनेतून सोलरवर करणार – लोणीकर

- Advertisement -

शोले पाहिला चक्क २२ दिवस

अमिताभ बच्चन यांचा शोले सिनेमा आपण २२ दिवस टुरिंग टॉकीजमध्ये पाहिल्याचे लोणीकर यांनी सांगितले. केवळ चित्रपटच पाहिला नाही तर सरपंच असताना तर मी अमिताभ बच्चन यांच्या सारखी हिप्पी हेअर स्टाइल ठेवण्याचा तसेच त्याचा सारखा पोशाख परिधान करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही लोणीकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींमुळेच आज मी मंत्री झालो आणि मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत बसण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले.

वाचा – मंत्र्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका

- Advertisement -

मुंबईच्या ट्राफिकमुळे बिग बी हैराण

दरम्यान, या कार्यक्रमाला स्वच्छ भारत मोहिमेचे दूत असलेले अमिताभ बच्चन मुंबईच्या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे उशिरा पोहोचल्याचे सांगितल्याने सर्वसामान्यांना प्रमाणे बिग बिनाही आज ट्राफिक समस्येचा सामना करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -