Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठवाडाMahayuti : मराठवाड्यातील सर्वात ज्येष्ठ आमदाराचे मंत्रिपदासाठी अर्जव; म्हणाले, 40 वर्षे भाजपचा...

Mahayuti : मराठवाड्यातील सर्वात ज्येष्ठ आमदाराचे मंत्रिपदासाठी अर्जव; म्हणाले, 40 वर्षे भाजपचा निष्ठावान अन् निष्कलंक 

Subscribe

जालना – महायुतीला विक्रमी बहुमत मिळाले आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार, यावरुन झालेला पेच अजून सुटलेला नाही. त्यामुळे सरकार स्थापनेचा दावा सहा दिवसानंतरही झालेला नाही. असे असले तरी मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आमदारांनी आपला दावा सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकीच एक मराठवाड्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव लोणीकर यांनी आज (29 नोव्हेंबर) मंत्रिमंडळात संधी मिळावी असा अर्जव केला आहे.

बबनराव लोणीकर हे परतूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. आज परतूर येथे झालेल्या कार्यकर्ता आभार मेळाव्यात लोणीकरांनी म्हटले आहे की, मी मराठवाड्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहे. 40 वर्षांपासून मी भाजपमधला निष्ठावंत कार्यकर्ता आहे. निष्ठावंत असण्यासोबतच निष्कलंक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोणीकर म्हणाले, 40 वर्षे निष्कलंक राहणे साधीसुधी गोष्ट नाही. मला मंत्रि‍पदाची संधी मिळावी”, अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीवर टीका

बबनराव लोणीकरांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आणि बरबटलेलं होते. साधुसंतांना रस्त्यात तुडवलं जात होतं, मारले जात होते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात येत होते. माझ्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. असा आरोप लोणीकरांनी केला.

40 वर्ष मी भाजप मधला निष्ठावंत कार्यकर्ता आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महायुतीचं सरकार येत आहे. यावेळी मंत्री पदाची संधी मला मिळावी, असं मी देवेंद्र फडणवीस यांना म्हणालो आहे, असं लोणीकर म्हणाले.

- Advertisement -

लोणीकर यांची यंदा आमदारकीची पाचवी टर्म आहे. मराठवाड्यात सलग पाचवेळा निवडून आलेले लोणीकर हे भाजपचे एकमेव आमदार आहेत. त्या दृष्टीने ते मराठवाड्यातील भाजपचे सर्वाधिक ज्येष्ठ आमदार आहेत. त्यामुळे यावेळी निष्ठेचे फळ म्हणून मंत्रिपद मिळावे अशी मागणी लोणीकरांनी केली आहे.

हेही वाचा : Shiv Sena : एकनाथ शिंदे तातडीने दरे गावी जाण्याचे कारण आले समोर; उदय सामंत म्हणाले, नाराजीचे कारण…

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -