Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र बबनराव पाचपुते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला

बबनराव पाचपुते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला

Subscribe

आता तर भाजपचे नेते बबनराव पाचपुते हेसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षाला वेग आला आहे. त्यातच काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच दिशा मिळत असल्याचे सध्या चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून अजित पवार यांच्या या कृतीबद्दल निषेध व्यक्त होत असताना भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांचे स्वागत केले आहे. आता तर भाजपचे नेते बबनराव पाचपुते हेसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.

बबनराव पाचपुते यांच्या भेटीकडे लक्ष

भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांचा राजकीय प्रवास या वेळी विचारात घेणे महत्त्वाचे आहे. जनता पक्षापासून काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि आता पुन्हा भाजप असा सतत पक्षांतर करण्याचा अनुभव बबनराव पाचपुते यांच्याकडे आहे. बबनराव पाचपुते हे शरद पवार यांच्या नेतृत्वात मोठे झालेले नेते आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेचं गणित जुळवण्यासाठी बबनराव पाचपुते यांची मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचे कोडे सोडवण्यात अजित पवार आणि बबनराव पाचपुते यांची भेट निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -