घरमहाराष्ट्रबालमृत्यू टाळण्यासाठी राज्यात ‘बेबी केअर किट’ योजना

बालमृत्यू टाळण्यासाठी राज्यात ‘बेबी केअर किट’ योजना

Subscribe

बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातू साहित्य उपलब्ध होणार

नवजात बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात २६ जानेवारीपासून ‘बेबी केअर किट’ योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार जन्माला येणार्‍या नवजात बालकाला अंगणवाडीमार्फत हे किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ज्यामध्ये बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक वस्तूंचा समावेश असणार आहे. राज्यातील प्रत्येक मातेला पहिल्या प्रसूतीच्यावेळी या योजनेचा फायदा घेता येणार आहे, असे महिला आणि बालविकास विभागाच्या शासन निर्णयात म्हटले आहे.

विकसित देशांमध्ये बालमृत्यू रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांमध्ये बालकांना ‘बेबी केअर किट’ पुरवण्यास प्राधान्य देण्यात येते. आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यात नवजात बालकांना ‘बेबी केअर किट’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लहान बालकांची अशाप्रकारे जन्मजात काळजी घेतल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यास या राज्यांना बर्‍यापैकी यश आले. महाराष्ट्रात वर्षाला साधारणपणे 20 लाख महिलांची प्रसूती होते. यामध्ये शहरी भागात आठ लाख, तर आदिवासी, ग्रामीण भागात बारा लाख महिलांची प्रसूती होते. नवजात बालक जन्माला आल्यानंतर त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक वस्तूंचा पुरवठा करून बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य होऊ शकेल, या उद्देशातून ही योजना मंजूर करण्यात आल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

- Advertisement -

किटमध्ये असणार हे साहित्य
लहान मुलांचे कपडे, झोपण्याची लहान गादी, लहान मुलांचे टॉवेल, तापमान यंत्र (इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर), लहान मुलांच्या अंगाला लावायचे तेल, शॅम्पू, खेळणी, नेल कटर, मच्छरदाणी, हातमोजे- पायमोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, लहान मुलांना बांधायचे कापड, सर्व साहित्य ठेवण्यासाठी बॅग.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -