घरमहाराष्ट्रदादरच्या 'या' स्विमिंग पूलमध्ये सापडले मगरीचे पिल्लू; नेमके काय आहे प्रकरण ?

दादरच्या ‘या’ स्विमिंग पूलमध्ये सापडले मगरीचे पिल्लू; नेमके काय आहे प्रकरण ?

Subscribe

मुंबई : नुकतेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी अजगर आढळून आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता दादरच्या शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये आज पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास एक मगरीचे पिल्लू आढळून आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. यावेळी स्विमिंग पूलच्या एका कर्मचाऱ्याने मगरीचे पिल्लू पाहिल्यानंतर त्याला पकडून ड्रममध्ये ठेवले. या स्विमिंग पूलच्या बाजूला असलेल्या प्राणीसंग्रहालयातून हे मगरीचे पिल्लू आल्याची शक्ता वर्तविली जात आहे.

यासंदर्भात वनविभाग, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यांना महात्मा गांधी स्विमिंग पूलच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजूला असलेल्या प्राणी संग्रहालयातून हे मगरीचे पिल्लू स्विमिंग पूलमध्ये आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी सुद्धा अजगर आणि सापा यासारखे अनेक प्राणीसंग्रहालयातून बाहेर पडल्याने येथे राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

- Advertisement -

मगरीचे पिल्लू पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असून हे मगरीचे पिल्लू स्विमिंग पूलमध्ये कुठून आले, याची चौकशी करण्यात येणार आहे. यानंतर आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी भविष्यात घेण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त किशोर गांधींनी दिली आहे.

हेही वाचा – शासकीय रुग्णालय मृत्यूचा सापळा असल्याची शंका येतेय; आदित्य ठाकरेंकडून चिंता व्यक्त

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती देताना जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले की, रोज पहाटे तरण तलाव सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार आज पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या तरण-तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर तज्ञांच्या मदतीने तत्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे, अशी ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – Harbor Railway : जम्बो मेगाब्लॉकनंतरही हार्बर मार्गावर प्रवाशांचे हाल सुरूच; आजही लोकल उशिरानेच

प्राणी संग्रहालयाला कोणाचा राजकीय वरदहस्त – संदीप देशपांडे

या स्विमिंग पूलच्या बाजूला असलेल्या प्राणी संग्रहालय असून ते अनधिकृत आहे. या संग्रहालयातून प्राणी बाहेर येतात, यापूर्वी अजगर आणि साप आलेला. जर हे प्राणी चावले तर कोणाची जबाबदारी आहे?, हे प्राणी पाळायला परवानगी कोणी दिली?, यासाठी प्राणी संग्रहालयाला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का?, ही जागा पालिकेने न्यायालयात जिंकली आहे. तरी कारवाई होत नाही. या प्रकरणी जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाने अनेक वेळा यासंदर्भात तक्रार केली असून या संग्रहालायतील प्राण्यांना दूरावस्थेत ठेवले जाते. यावर वन विभागाकडून कारवाई का केली जात नाही?, यासंदर्भात आज मुंबई आयुक्तांना भेटून हा विषय मांडण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -