घरमहाराष्ट्रबाळा तुझ्या आईने..., सुषमा अंधारेंनी लेकीसाठी लिहिली भावनिक पोस्ट

बाळा तुझ्या आईने…, सुषमा अंधारेंनी लेकीसाठी लिहिली भावनिक पोस्ट

Subscribe

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची बुलंद तोफ होत सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाची बाजू लावून धरली. एकनाथ शिंदे गट आणि भाजपाविरोधात राण उठवून विरोधकांची पळता भूई थोडी केली. परंतु, आता त्यांच्यावर त्यांच्या विभक्त पतीकडूनच विरोध होताना दिसतोय. वैद्यनाथ वाघमारे यांनी आज सुषमा अंधारे यांना आव्हान दिल्याने सुषमा अंधारे अधिक पेटून उठल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या लेकीसाठी खास भावनिक पोस्टही लिहिली आहे.

प्रिय कब्बु,

- Advertisement -

तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं.. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता. पण अख्ख कुटुंब पाठीशी उभं राहिलं.. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलून मी आल्या पावली घारीसारखी तुझ्याकडे झेपावले.

बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!

- Advertisement -

तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात, बाबासाहेब लिहितात, “जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..! भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा” _ डॉ बाबासाहेब आंबेडकर

हेही वाचा अंधारेंच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णयामुळेच आमच्यात मतभेद, वाघमारेंचा शिंदे गटात प्रवेश

सुषमा अंधारे माझ्यामुळे मोठ्या झाल्या. माझ्यामुळे त्या हुशार झाल्या, अशी माहिती सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैद्यनाथ वाघमारे यांनी आज माध्यमांसमोर दिली. त्यानंतर आज दिवसभर यावरून गदारोळ सुरू आहे. वैद्यनाथ वाघमारे यांची राजकीय फ्रेममध्ये एन्ट्री होताच सुषमा अंधारे यांनीही आपली बाजू सावरण्यासाठी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी कोण काय बोलतं, याने मला फरत पडत नाही अशी ठाम भूमिका सांगितली. तसंच, माझ्या मुलीचं नाव कबिरा सुषमा अंधारे यातच सगळं आलं, असंही त्या म्हणाल्या.  आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मुलीचं नाव सांगून आणखी धीटाने यापुढची लढाई लढणार असल्याचं सांगितलं. आपल्या पतीपासून त्या विभक्त झाल्या असल्याने ते काय करतात, कोणती भूमिका घेतात यावर काहीही निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा – ते मित्र नाहीत, मग शत्रू तरी का मानू? विभक्त पतीच्या आरोपांवर सुषमा अंधारेंचे सडेतोड उत्तर

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -