घरताज्या घडामोडीVideo: स्मशानभुमीत घर दिलं तरी तिथूनही काम करेल - बच्चू कडू

Video: स्मशानभुमीत घर दिलं तरी तिथूनही काम करेल – बच्चू कडू

Subscribe

महाविकास आघाडीचा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र अद्यापही मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालेले नाही. खातेवाटपाच्या आधीच मंत्र्यांना बंगले आणि केबिनचे वाटप करण्यात आले आहे. अनेक मंत्र्यांनी अमुकतमुक बंगला आणि केबिन मिळावी म्हणून दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. मात्र बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे अपवाद ठरले आहेत. बच्चू कडू यांना स्मशानभूमीच्या शेजारी घर देण्यात आले आहे. “मला स्मशानात जरी घर दिले तरी काही फरक पडणार नाही, मी तिथूनही काम करेल”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

 

- Advertisement -

बच्चू कडू म्हणाले की, “स्मशानभूमीच्या बाजुला बंगला असल्यामुळे अनेक मंत्र्यांनी तो नाकारला आहे. तिथे नकारात्मकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण मला तशी भीती नाही, नकारात्मकतेला आम्ही सकारात्मकतेमध्ये आणू. एवढेच काय तर आम्हाला स्मशानात जागा दिली तरी आम्ही काम करु. जिथे आम्हाला घर दिले तिथे काम करु”

अधिकाऱ्यांवर व्यक्त केली नाराजी

बंगला आणि कार्यालय मंत्रालयापासून दूर देऊन अधिकाऱ्यांनी बदमाशी केली असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. माझ्याकडे अंपग बांधव जास्त येतात, त्यामुळे मंत्रालयात कार्यालय दिले असते तर बरे झाले असते. मात्र मला विधानभवनात कार्यालय देण्यात आले आहे. मात्र कितीही विचित्र अवस्था असली तरी त्यातून मार्ग काढत काम करु, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -