फोन टॅपिंग प्रकरणात बच्चू कडू स्पष्टच म्हणाले, ”क्लीन चिटची वेळ कधी येणार…”

bacchu kadu reaction on rashmi shukla phone tapping case

फोन टॅपिंग प्रकरणातील आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली, या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख, मंत्री बच्चू कडू यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याबद्दल पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 2017 – 18 या कालावधीत हे फोन टॅपिंग झाले. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.यावर आज प्रहार संघटनेचे प्रमुख आणि अपक्ष नेते बच्चू कडू यांनी देखील आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. मला या प्रकरणात क्लीन चीटची गरज नाही, अधिकाराची, कुठल्या पक्षाची गरज नाही, अशी वेळ बच्चू कडूवर येणार नाही, असं स्पष्ट मत बच्चू कडू यांनी दिले आहे. पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी बच्चू कडू विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधत होते.

‘…अशी वेळ बच्चू कडूवर येणार नाही’

बच्चू कडू म्हणाले की, बच्चू कडू गांजा,अफूची तस्करी करत असल्याचे फोन टॅपिंगमधून त्यांना आढळून आले, जे काही कोणी केलं असे आणि कोणता अधिकारी अशा पद्धतीने वागत असेल तर ही नालायकी आहे. मला क्लीन चीटची गरज नाही, अधिकाराची, कुठल्या पक्षाची गरज नाही, अशी वेळ बच्चू कडूवर येणार नाही तो विषयचं नाही. जर केलं असेल तर सिद्ध करावे, त्यासाठी कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही, आम्ही त्यात आहेच नाही तर काय संबंध? अस स्पष्टीकरण बच्चू कडू म्हणाले आहेत.

या प्रकरणी अद्यापही चौकशी सुरु आहे. मात्र या प्रकरणात विरोधातील मंत्र्यांचे नावं समोर आल्याने सत्ताधाऱ्यांकडून उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहे. रश्मी शुक्ला यांनी पुण्यात अमली पदार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे फोफावत असून या संवेदनशील गुन्ह्यांची उकल करण्याचा बनाव करत अवैधरित्या मंत्र्यांचे फोन टॅप केले. ज्यातून त्यांनी टेलिग्राफ कायद्याचा भंग केला.यात बच्चू कडू यांनाही अमली पदार्थांचा विक्रेता भासवत त्यांना निजामुद्दीन बाबू शेख हे कोडनेम देण्यात आले, आणि टेलिग्राफ कायद्याचा भंग करून शुक्ला यांनी त्यांच्यासह अनेक मंत्र्यांचे फोन टॅप केले.

मंत्रीपदाच्या नाराजीवर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण

नाराज असल्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आलो नाही असे काही नाही. कामानिमित्त बाहेर होतो म्हणून येऊ शकलो नाही आणि नाराज असल्याने न येण्याचे काय कारण आहे? सभागृहात नाराजी काढण्याचे काही कारण नाही. यापूर्वी सांगतले की, व्यक्तिगत हितासाठी नाराज होणार नाही. महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर लढाई चालू राहिल. असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले आहे.


पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; ‘या’ मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता