घरCORONA UPDATECorona Quarantine: 'त्या तीन दिवसांत मी मृत्यू अनुभवत होतो' बच्चू कडूंचा थरारक...

Corona Quarantine: ‘त्या तीन दिवसांत मी मृत्यू अनुभवत होतो’ बच्चू कडूंचा थरारक अनुभव

Subscribe

पुर्ण विश्वात सध्या कोरोना हा एकच विषय कळीचा बनला आहे. त्याला भारत आणि महाराष्ट्र देखील अपवाद नाही. सरकार, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन हे जीवावर उदार होऊन कोरोनाचे संक्रमन रोखण्यासाठी काम करत आहेत. अशात त्यांना कोरोनाची लागण होण्याची संभावना असते. अशातच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या भावनांना फेसबुकवर वाट मोकळी करुन दिली आहे. २७ मार्च पासून बच्चू कडू डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आयसोलेशनमध्ये होते. या तीन दिवसांत सतत आपण पॉझिटिव्ह निघालो तर.. आपल्या संपर्कात आलेल्यांना लागण झाली तर, असं नको व्हायला.. या आणि अनेक विचारांचे काहूर बच्चू कडू यांच्या डोक्यात माजले होते. हा थरारक अनुभव त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच कडू यांनी २३ मार्चपासूनचा घटनाक्रम सांगितला आहे. सुरुवातील थोडा घसा खवखवत होता. थोडा खोकला होता. तेव्हापासूनच “मी कोरोनाला बळी तर पडणार नाही…?” हा प्रश्न कडू यांना सतावू लागला. त्यावेळी त्यांनी अकोला येथील सिव्हील सर्जन चव्हाण यांच्याशी बोलल्यानंतर अमरावती येथील सिव्हील सर्जन निकम यांच्याकडून तपासणी करुन घेतली. डॉक्टरांनी शंका व्यक्त केल्यानंतर पुन्हा २९ मार्च रोजी चाचणी करण्याचे ठरले आणि २७ मार्चपासून बच्चू कडू क्वारंटाईनमध्ये गेले.

- Advertisement -

या तीन दिवसांत घरात असूनही बेड, ताट, चहाचा कप असे सर्व साहित्या कडूंसाठी वेगळे काढण्यात आले. या काळात दि. २३ ते २७ पर्यंत आपण हजारो लोकांना भेटलो. चर्चा केली. जर आपण पॉझिटिव्ह निघालो तर त्या लोकांचे काय होणार? दहावीला असलेला आपला मुलगा देवा, पत्नी नयना यांना तर याची लागण होणार नाही ना? असे अनेक प्रश्न बच्चू कडू यांना सतावू लागले. बच्चू कडू त्यांच्या शब्दात म्हणतात, “२५ वर्ष केलेल्या संघर्षाला आता कुठे सुखाची किनार लाभली होती. गरीब कार्यकर्त्यांसाठी योजना आखल्या होत्या. त्या मागे पडणार का?” असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले होते.

मी अनुभवलेले कोरोनाचे ३ दिवस, कृपया घरा बाहेर पडु नका ही हात जोडून विनंती…

Bacchu Kadu ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮಾರ್ಚ್ 30, 2020

- Advertisement -

 

या काळात अनेकांनी मन सावरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील फोन आला होता. त्यांनी काळजी घ्यायला सांगितले. आज सकाळी माझा रिपोर्ट येणार होता, म्हणून काल रात्रभर मला झोपट लागली नाही. जेव्हा आज सकाळी ७.३० वाजता खासगी सचिवाने फोन करुन रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले, तेवी मी उडीच घेतली. डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. माझ्या पत्नीला निवडून आल्यापेक्षाही आज जास्त आनंद झाला. त्यामुळेच मी सर्वांना हात जोडते, पाया पडतो. पण नियम पाळा, त्या ३ दिवसांत मी माझा मृत्यू पाहत होतो, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -