Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी अजित पवारांवर दबाव असेल तर..., बच्चू कडूंची प्रतिक्रिया

अजित पवारांवर दबाव असेल तर…, बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तांतराच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी पक्षांकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यावेळी अजित पवारांच्या नव्या राजकीय समीकरणाबाबत आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे

आमदार बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अजित पवार हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस की भाजपात जाणार?, याबाबत मला काही अभ्यास नाही. कोण, कधी आणि कुठे जाणार?, हे काही सध्या सांगता येत नाही. पण गेले तरी कुणालाही वावगं नाही. कारण तो आपला स्वतंत्र निर्णय आहे. राजकीय सोईनुसार लोकं फेरबदल करत राहतात. ही काही विशेष बाब नाहीये, असं बच्चू कडू म्हणाले.

- Advertisement -

अजित पवारांवर दबाव असेल असं काही मला वाटत नाही. अजित पवारांवर दबाव असेल तर जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्णय होईल. इतक्या मोठ्या नेत्यावर दबाव वाढतो तेव्हा त्यांच्यावर दबाव येईपर्यंत राजकारण सुरू असेल. महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही, हे सर्व डोक्याच्या पलीकडचं आहे, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी अजित पवार यांना उघड पाठिंबा दिला आहे. तसेच अजित पवार हेही विधिमंडळात दाखल झाले आहेत. त्यामुळे सत्ता बदलाच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. मी कोणालाही उत्तर द्यायला बांधिल नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी माध्यमांना दिले आहे.


- Advertisement -

हेही वाचा : मी कोणालाही उत्तर द्यायला बांधिल नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण


 

- Advertisment -