घरमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? यावर बच्चू कडू म्हणाले,"फक्त २० आमदारांनाच..."

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? यावर बच्चू कडू म्हणाले,”फक्त २० आमदारांनाच…”

Subscribe

जानेवारी महिना उलटून गेलाय तरी अद्याप पुढील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काही हालचाली नाहीत. पण बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही प्रतिक्रिया दिलीय. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे त्यांनी सांगितलं.

धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? शिंदे गटाचं की ठाकरे गटाचं? याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. पण त्याआधीच प्रहारचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाकीत केलंय. शिवाय, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे त्यांनी सांगितलं.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त काही लागेना. विरोधकांकडून डागण्यात आलेल्या टीकास्त्रांनंतर २० मंत्र्यांचा शपथविधी करण्यात आला. मात्र, आता जानेवारी महिना उलटून गेलाय तरी अद्याप पुढील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काही हालचाली नाहीत. पण बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही प्रतिक्रिया दिलीय.

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मोठा पेच असणार आहे. कारण शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. इतकंच नाही, तर काही अपक्षही मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. यात बच्चू कडू यांचं सुद्धा नाव आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी अनेकदा मंत्रीपदाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने अपंग मंत्रालय स्वतंत्रपणे सुरू करण्याची घोषणा केली. मात्र अजूनपर्यंत या मंत्रालयाचा कारभार कुणालाही सोपवण्यात आलेला नाही. बच्चू कडूंनी अनेकदा या मंत्रालयाची जबाबदारी आपल्याला मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

आता बच्चू कडूंनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत प्रतिक्रिया देत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. धनुष्यबाणाचा निर्णय आला की लगेच दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले आहे. “धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय होत नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबला आहे. मंत्रिमंडळ विस्तार करू नये, अशी सरकारची कोणतीच मानसिकता नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आम्ही भेट घेतली तेव्हा त्यांनीही मान्य केलं की, एकाच व्यक्तीवर जास्त खात्याचा भार आहे. त्यामुळे ताण येत आहे आणि महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असं त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या निर्णयावरच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला आहे असं वाटतं. निर्णय झाला की विस्तार होईल, असेही कडू म्हणाले.

- Advertisement -

म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबवला जातोय…- बच्चू कडू

सर्वच आमदारांना आनंदाची झोप लागली पाहिजे, यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार लांबवला जातोय, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी केले. त्यानंतर बच्चू कडू यांच्या नाराजीवरून राजकीय वर्तळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे.

धनुष्यबाण नक्की कुणाला मिळणार?

धनुष्यबाण नक्की कुणाला मिळणार यावरही बच्चू कडूंनी आपलं भाकीत दिलंय. धनुष्यबाण हे शिंदे गटाला मिळणार की ठाकरे गटाला हे ठरणार आहे, यावर प्रहारचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार आहे आमदार, खासदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संख्या ही शिंदे गटाकडे जास्त आहे. यापूर्वी धनुष्यबाणासंदर्भात जे निर्णय आले त्याचा विचार करता शिंदे गटाकडेच धनुष्यबाण जाणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -