घरमहाराष्ट्रनागपूरनागपूर जिल्हा बॅंकेची लिलाव प्रक्रिया बच्चू कडूंनी हाणून पाडली, म्हणाले, "बॅंकेची रावणशाही...."

नागपूर जिल्हा बॅंकेची लिलाव प्रक्रिया बच्चू कडूंनी हाणून पाडली, म्हणाले, “बॅंकेची रावणशाही….”

Subscribe

बच्चू कडू हे त्यांच्या शोले स्टाईल आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. आमदार कडू जेथे जातील तेथे कार्यकर्ते "आपला भिडू बच्चू कडू'असा नारा का लावतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

बच्चू कडू यांनी मात्र नेहमीच शेतकरी आणि अपंगांच्या समस्या सोडवण्यासाठी आक्रमक होत असतात. बच्चू कडू हे त्यांच्या शोले स्टाईल आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. आमदार कडू जेथे जातील तेथे कार्यकर्ते “आपला भिडू बच्चू कडू’असा नारा का लावतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आमदार बच्चू कडूंनी आक्रमक होत नागपुर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यास भाग पाडलं. त्यामुळे संतप्त शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलावासंदर्भातली तहकूब केलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली होती. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांकडून लिलावासंदर्भातली नोटीस बजावण्यात आलीये. याप्रकरणी आमदार बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी बच्चू कडूंना यासंदर्भात निवेदन दिले होते. तेव्हाच त्यांनी जिल्हा बॅंकेची लिलाव प्रक्रिया उधळून लावण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे आज ते जिल्हा बॅंकेवर धडकले आणि बॅंकेच्या अधिकाऱ्यांना खडसावले.

- Advertisement -

अवसायानात निघालेल्या जिल्हा बॅंकेवरील प्रशासकांनी कर्ज वसुलीसाठी थेट शेतकऱ्यांच्या संपत्ती लिलावाच्या नोटीस बजावल्याने सर्व शेतकरी सुद्धा आक्रमक झाले होते. यावेळी धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडूकडे आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर बच्चू कडूंनी बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसंच शेतकऱ्यांच्या संपत्तीची लिलाव प्रक्रिया पुढे ढकलण्याऐवजी शेतकऱ्यांच्या कर्जावर तोडगा काढता येतोय का? यावर विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव तुर्तास रद्द करा, असं खडसावून सांगितलं. त्यानंतर बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लिलाव तुर्तास रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. तसंच येत्या १५ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांसोबत आमदार बच्चू कडू आणि बॅंकेचे प्रशासक एकत्र बसून यावर चर्चा करून तोडगा काढू, असं आश्वासन देण्यात आलं.

यावेळी आमदार बच्चू कडू यांनी बॅंकेची रावणशाही चालणार नाही, असा इशारा दिला. “शेतकऱ्यांची २० लाखांची संपत्ती यांच्या संगमताने कुणी पाच लाखात घेत असाल, तर हे आम्ही होऊ देणार नाही. शेतकऱ्याची जमीन कुणी लिलावात घेतली तर त्याचे हात पाय तोडल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा देखील बच्चू कडूंनी दिलाय. शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याची पद्धत आम्ही हाणून पाडू, असं देखील बच्चू कडूंनी ठणकावून सांगितलं. खाजगी सावकार पद्धती जर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत होत असेल तर हे निषेधार्थ असं देखील ते म्हणाले.

- Advertisement -

त्यामुळे बच्चू कडूंच्या दणक्यानंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा हा लिलाव तुर्तास रद्द झाला असला तरी यात सरकार हस्तक्षेप करणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -