घरमहाराष्ट्रमंत्री तर मी होणारच आहे..., बच्चू कडूंचा दावा; दिव्यांग मंत्रालयामुळे आनंद

मंत्री तर मी होणारच आहे…, बच्चू कडूंचा दावा; दिव्यांग मंत्रालयामुळे आनंद

Subscribe

बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तसंच, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागेल की नाही याबाबतही साशंकता होती. त्यामुळे बच्चू कडू यांची सरकारवरील नाराजी उघड झाली होती. मात्र, आता स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अमरावती – काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांग मंत्रालयाची घोषणा करण्यात आली. शिंदे -फडणवीस सरकारच्या या निर्णयानंतर नाराज असलेले आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आनंद व्यक्त केला आहे. ज्या दिवशी देशाच्या बजेटचं पहिलं पान दिव्यांग, विधवा महिला, शेतकरी, मजुर आणि वचिता यांच्यासाठी लिहिला जाईल, तो सर्वांत सुंदर बजेट असेल, असं अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

हेही वाचा – ‘खोके सरकार’ प्रायश्चित्त घेणार का? महावितरणच्या कारभारावरून ठाकरे गटाचा सवाल

- Advertisement -

बच्चू कडू म्हणाले की, राज्यात स्वतंत्र ‘दिव्यांग मंत्रालय’ला मंजुरी देण्यात आली आहे. हे देशातील अशा प्रकारचं पहिलंच मंत्रालय आहे. आपण कुणासाठी काम केलं पाहिजे? असा एक मोठा संदेश देशात गेला आहे. आम्ही नेहमी म्हणायचो की, अर्थसंकल्पाचं पहिलं पान ज्यादिवशी दिव्यांगासाठी, विधवा महिलांसाठी, शेतकरी, मजुरांसाठी आणि वंचितासाठी लिहिला जाईल, तेव्हा देशाचं बजेट सर्वात सुंदर असेल. असा अर्थसंकल्प देशाला सक्षम करणारा असेल.

बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तसंच, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागेल की नाही याबाबतही साशंकता होती. त्यामुळे बच्चू कडू यांची सरकारवरील नाराजी उघड झाली होती. मात्र, आता स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “मला वाटतं की, मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु:ख आता मी विसरून गेलो आहे. नवीन सुखाची पाऊलवाट आता सुरू झाली आहे. दिव्यांग मंत्रालयाला मंजुरी मिळाली आहे. मला आत्मविश्वास आहे की, दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्रीही बच्चू कडूच असेल.”

- Advertisement -

हेही वाचा – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

एवढंच नव्हे तर, मंत्रीपद गेलं चुलीत असंही ते म्हणाले. मंत्रिपद मिळणार असल्याने तुम्ही आनंदी आहात का? असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “मंत्रिपद वगैरे चुलीत घाला. तुम्ही शेवटी त्याच मुद्द्यावर येता. माझ्यासाठी मंत्रिपद फार महत्त्वाचं नाही. मंत्री तर मी होणारच आहे. कारण एकनाथ शिंदेंनी शब्द दिला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलं आहे. पण आधी सेवा करू. दिव्यांगाच्या शेवटच्या घरापर्यंत सेवा देऊ. हे मंत्रालय केवळ मंत्रालयापुरतं मर्यादीत राहणार नाही. दिव्यांगाच्या उंबरठ्यावर जाऊन त्याला सेवा देण्याचं काम आम्ही करणार आहोत” असं कडू म्हणाले.

हेही वाचा – तुकाराम मुंढेंची दोन महिन्यांत आरोग्य खात्यातून उचलबांगडी, नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -