सरकारविरोधात लवकरच अविश्वास प्रस्ताव, ‘हा’ पक्ष घेणार पुढाकार

uddhav thackeray

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांकडून आक्रमक खेळीस सुरूवात झाली आहे. राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपकडून अद्यापही मौन बाळगण्यात आले आहे. दुसरीकडे लहान पक्ष अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळ सरकारविरोधात आता लवकरच अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. भाजप नव्हे तर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू अविश्वासाचा ठरावासाठी पुढाकार घेणार आहेत.

राज्यमंत्री बच्चू कडू हे महाविकास आघाडीचे मंत्री आहेत. विधानसभेत त्यांच्यासह दोन सदस्य आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये बच्चू कडू हे राज्यपालांची भेट घेऊन अविश्वासाचा ठराव दाखल करण्याची शक्यता आहे. बच्चू कडू हे राज्यपालांची भेट घेऊन पाठिंबा काढल्याचे पत्र सादर करणार असल्याची माहिती आहे. या पत्रानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात.

महाराष्ट्र सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या पडद्याआडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात १८ कॅबिनेट, १० राज्यमंत्री पदासह २ मंत्री असणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत भाजप आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या चर्चेनुसार, दर ६ आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते.


हेही वाचा : त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करावीत, एकनाथ शिंदेंचं शिवसेनेला आव्हान