घरमहाराष्ट्रबच्चू कडू, काँग्रेस आमदाराची महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी; अबु आझमी घेणार मुख्यमंत्र्यांची...

बच्चू कडू, काँग्रेस आमदाराची महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी; अबु आझमी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Subscribe

राज्यसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी महाविकास आघाडीची ट्रायडंटमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला एकूण 12 अपक्ष आमदार उपस्थित होते. काँग्रेसचे एक आमदार, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे बैठकीला नव्हते. दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते अबु असीम आझमी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आधी आजमी यांनी तात्त्विक मुद्द्यावरून आघाडीची कोंडी केली होती.

गीता जैन, देवेंद्र भुयार, मंजुळा गावित, आशिष जयस्वाल, किशोर जोरगेवार, नरेंद्र भोंडकर, श्यामसुंदर शिंदे, संजय मामा शिंदे, चंद्रकांत पाटील (जळगाव), विनोद निकोले, विनोद अग्रवाल आणि राजकुमार पटेल या अपक्ष आमदारांनी आजच्या बैठकीला हजेरी लावून आम्ही आघाडीसोबत असल्याचे दाखवून दिले. तब्बल 12 अपक्ष आमदार उपस्थित होते. त्यामुळे आघाडीच्या जिवात जीव आला आहे. इतरही अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष आपल्यासोबत येतील असा दावा आघाडीचे नेते करत आहेत.

- Advertisement -

काँग्रेस आमदार पोहोचलेच नाहीत –
काँग्रेसने काल सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काँग्रेसचे आमदार मुंबईत आले. मात्र, काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे बैठकीला पोहोचू शकले नाहीत. कुटुंबात लग्न सोहळा असल्याने ते बैठकीला पोहोचले नाही. त्यांनी पक्षश्रेष्ठींना तसे कळवलंही आहे. आज रात्री उशिरापर्यंत ते मुंबईत येणार आहेत.

बच्चू कडूंची दांडी –
प्रहार संघटनेचे नेते मंत्री बच्चू कडू हे आजच्या बैठकीला दिसले नाहीत. बच्चू कडू यांनी मतदानाच्या पाच मिनिटाच्या आधी मतदानाबाबतचा फैसला करू, असा इशारा दिला होता. त्यातच ते आज बैठकीला न आल्याने त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -