Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्र...हा तर राष्ट्रवादीचा मोठा गेम, पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर बच्चू कडूंचा प्रहार

…हा तर राष्ट्रवादीचा मोठा गेम, पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बच्चू कडूंचा प्रहार

Subscribe

शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. ते जे बोलतात, तसं त्यांनी कधीच केलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आताच्या खेळीनुसार पाहिलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं डोकं फुटू नये एवढचं मी सांगेन असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचेचे नेते असल्याचं वक्तव्य केलं आहे. आमच्यात कोणाताही वाद नाही, असं जाहीर वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार हे सातत्यानं विरोधकांना संभ्रमात टाकताना दिसत आहेत. अनेकांना राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे हे कळत नाहीये. यावर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे. (Bachchu Kadu Criticized Sharad pawar over his statement on Ajit Pawar)

काय म्हणाले बच्चू कडू?

बच्चू कडू म्हणाले की, शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. ते जे बोलतात, तसं त्यांनी कधीच केलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आताच्या खेळीनुसार पाहिलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं डोकं फुटू नये एवढचं मी सांगेन, असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.

- Advertisement -

एकीकडे ते म्हणतात फूट नाही, दुसरीकडे ते नोटीस देतात. हा सगळा मोठा खेळ आहे. हा मोठा गेम असू शकतो. एकतर आघाडीत राहून शरद पवार लढतील आणि युतीत राहून अजित पवार लढतील. नंतर दोन्ही नद्यांचा संगम होऊन पुन्हा आपलाच एक सागर तयार करू शकतील, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत, अशी खोचक टीका बच्चू कडू यांनी यावेळी केली.

काय म्हणाले होते शरद पवार ? 

सुप्रिय सुळे यांनी राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचं शरद पवार यांनी समर्थन केलं. शरद पवार म्हणाले की, अजित पवार पक्षाचे नेते असून त्यावर कोणताच वाद नाही. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. काही लोकांनी वगेळी भूमिका घेतली आहे, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा :राष्ट्रवादीचे गोलमाल! शरद पवार म्हणतात- पक्षात फूट नाही; वेगळी भूमिका घेतलेल्यांना पुन्हा संधी नाही )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -