घरमहाराष्ट्रBachchu Kadu :'त्यांनी बोलवले म्हणून मी सत्तेत'; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

Bachchu Kadu :’त्यांनी बोलवले म्हणून मी सत्तेत’; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

Subscribe

आपल्या रोखठोक वक्तव्याने परिचीत असलेले आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ते अहमदनगरमध्ये मीडियाशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात सरकारमध्ये असल्याचा आपल्याला काही फरक पडत नाही.

अहमदनगर : आगामी लोकसभा, विधानसभा पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाही अजूनही राज्यातील सत्तांतराच्या घटनेला या ना त्या कारणाने उजाळा मिळतो. आता पुन्हा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या या गौप्यस्फोटाने उजाळा मिळाला आहे. कारण, मी सत्तेत गेलो नव्हतो, तर त्यांचेच फोन आले होते असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. (Bachchu Kadu I am in power because they called me Secret explosion of Bachchu Kadu)

आपल्या रोखठोक वक्तव्याने परिचीत असलेले आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ते अहमदनगरमध्ये मीडियाशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात सरकारमध्ये असल्याचा आपल्याला काही फरक पडत नाही. लोकशाहीत अशी विषमता निर्माण केली जात असेल तर ती आम्ही स्पष्टपणे मांडू. मग आम्हाला तुम्ही सत्तेतून बाहेर काढलं तरी चालेल. आम्ही काही त्याची पर्वा करत नाही. मी काही सत्तेत गेलो नव्हतो. त्यांचेच फोन मला आले होते. त्यामुळे मी त्याचा विचार करत नाही. आमचं दु:ख स्पष्टपणे मांडण्याची आमची भूमिका आहे. बच्चू कडू असा आहे. पटत असेल तर ठेवा नाहीतर नका ठेवू असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला.

- Advertisement -

हेही वाचा : Hemant Soren : अखेर 40 तासांनंतर हेमंत सोरेन प्रकटले; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी होणार चौकशी

आम्ही अशा फाटक्या घराला मोदींचं पोस्टर लावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेत दुजाभाव केला जात आहे. पंतप्रधान आवास योजनेत शहरासाठी अडीच लाख व मागेल त्याला घर दिलं जातं. पण तीच योजना गावात अटी घालून फक्त सव्वा लाखात दिली जाते. हा ग्रामीण भागातील नागरिकांचा अपमान आहे. आम्ही अशा फाटक्या घराला मोदींचं पोस्टर लावलं. हा असा न्याय आहे का? आमची मतांची किंमत सारखीच आहे असेही आमदार बच्चू कडू यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Vs OBC : ओबीसी नेते आक्रमक; जरांगेंना कोर्टात खेचण्याची भाषा

शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबितच

राज सरकारवर टीका करताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, आज कांद्याचे भाव पडलेले आहेत. ऊसाचे भाव पडले, कापसाला, सोयाबीनला भाव नाही. मग असं म्हणायला काही हरकत नाही की, आमच्या शेतमालाला कुणीच भाव दिला नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला मत देत नाही. असं म्हणण्याची शेतकऱ्यांने हिंमत दाखवावी. शेतकऱ्यांनी थेट आम्ही मत देणार नाही असं म्हणावं. मग आंदोलनही करण्याची गरज नाही. जातीचे प्रश्न ज्या पद्धतीने सरकारने हाताळले, त्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळले जात नाहीत अशी नाराजी बच्चू कडूंनी बोलून दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -