बच्चू कडूंची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता, शिंदे गटातील संजय शिरसाट नाराज?

Bachchu Kadu

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिपदाच्या वाटपाच्या हालचालींना सुरूवात झाली आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपेक्षा आता वाढलेल्या असल्याची चर्चा आहे. कारण प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेल्या बच्चू कडू यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. प्रहारमध्ये दोन आमदार असल्यामुळे शिंदेंच्या बंडाळीत प्रहारचीही मोठी साथ लाभली आहे. त्यामुळे कडू यांच्या मागणीचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

बच्चू कडू यांनी कृषी, जलसंधारण किंवा ग्रामविकास अशी जनतेशी नाळ जोडणारी खाती मागितल्याचं सांगण्यात जातंय. मात्र, इतर दोन नेत्यांना कोणती खाती मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट देखील नाराज असल्याची चर्चा आहे.

औरंगाबादेतून अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांची देखील पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, संजय सिरसाट मंत्रिपदासाठी अडून बसल्याचं बोललं जातंय. औरंगाबादेत तीन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु संजय शिरसाट यांना एखादं महामंडळ किंवा अन्य पद मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात बैठक, ओबीसी आरक्षणासंदर्भात घेतला आढावा