घरताज्या घडामोडीआम्हाला ५० आमदारांचा पाठिंबा, काँग्रेसमधील आमदार संपर्कात; राज्यमंत्री बच्चू कडूंचा दावा

आम्हाला ५० आमदारांचा पाठिंबा, काँग्रेसमधील आमदार संपर्कात; राज्यमंत्री बच्चू कडूंचा दावा

Subscribe

शिवसेनेचे गटनेता असलेल्या एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील चर्चेला उधाण आलं आहे. आम्ही आता गुवाहाटीला आहे. आमची एक बैठक होणार असून संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल. आमच्यासोबत आता अपक्ष आणि छोटे आमदार मिळून ३५ आमदार आहेत. तसेच ३ ते ४ शिवसैनिक अजून जॉईन होणार आहेत. त्यामुळे हा आकडा ३९ पर्यंत जाईल. तसेच अपक्ष आमदार मिळून हा आकडा ५० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधले काही आमदार संपर्कात असून येत्या दोन-तीन दिवसांत हे सर्व चित्र स्पष्ट होईल.

निधीतली विषमता आहे

बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, आमचा पक्ष शिवसेनेला समर्पित घटक पक्ष आहे. सेनेच्या दोन आमदारांच्या माध्यमातून आम्ही आघाडीला पाठींबा दिला होता. शिंदेसोबत असलेले सर्व आमदार खुश आहेत. शिवसेनेचे ७५ टक्के आमदार येथे आल्याने आम्हीही येथे आलो. कोणतीही व्यक्तिगत नाराजी नाही. निधीतली विषमता आहे, शिवसेनेने त्याकडे लक्ष दिलेलं नाही, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

- Advertisement -

दोन्ही निवडणुकांमध्ये आम्ही सेनेलाच मतदान केलं

तुमच्याशी कोणी संपर्क साधला होता का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बच्चू कडू म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. त्यांना सांगितलं की दोन्ही निवडणुकांमध्ये आम्ही सेनेलाच मतदान केलं आहे, मग हे अचानक वातावरण तयार झालं आणि त्याच्यासोबत परिस्थिती बदलली.

…आता अपक्षांचे दिवस येणार आहेत?

हे मी पुढील पाच वर्षांसाठी म्हटलं होतं. मात्र, ते योगायोगाने ही आताच घडत आहे. मला यासंदर्भात काहीही माहिती नव्हती. परंतु आम्ही जे बोललो ते येथे होणार, हे मला माहिती नव्हतं. मतदार संघातले काही विषय मार्गी लावावेत, असा आमचा विश्वास आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : आगामी सरकारमध्ये प्रहारचा मुख्यमंत्री होईल, राज्यमंत्री बच्चू कडूंचा अजब दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -