Homeमहाराष्ट्रBachchu Kadu Vs Bhujbal : मराठा कायदेशीर मार्गाने कुणबी प्रमाणपत्र मिळवत आहे;...

Bachchu Kadu Vs Bhujbal : मराठा कायदेशीर मार्गाने कुणबी प्रमाणपत्र मिळवत आहे; कडूंचा भुजबळांवर हल्ला

Subscribe

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी लावून धरली आहे.

मुंबई : राज्यातील राजकारणात पक्षा-पक्षांमधील वाद सुरू असतानाच आता निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील राजकारण आरक्षणाभोवती फिरत आहे. अशातच मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगलेला असतानाच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली असून, यामुळे पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची शक्यात आहे. (Bachchu Kadu Vs Bhujbal  Maratha getting Kunbi certificate through legal means Kadus attack on Bhujbal)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी लावून धरली आहे. यासाठी न्यायमूर्ती शिंदेंची समिती सर्वेक्षण करत असून, ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ती समितीच बरखास्त करावी अशी मागणी केली आहे. तेव्हा यावरून नवा वाद निर्माण झालेला असतानाच मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक बच्चू कडू यांनी मराठा समाजाच्या आपण खंबीरपणे पाठीशी उभे असून, ते कायदेशीररित्या कुणबी जात प्रमाणपत्र मिळवत असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तेव्हा आता बच्चू कडू यांना छगन भुजबळ कोणत्या शब्दांत उत्तर देतात हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : NCP DISPUTE: ‘अजित पवार भेकड’; शरद पवार गटाच्या टीकेला तटकरेंचं उत्तर, म्हणाले, शंभर नंबरी नाणं…

बच्चू कडूंनी आकडेवारीच केली जाहीर

मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र मिळत असून, आतापर्यंत किती जात प्रमाणपत्र मिळाले आणि किती शिल्लक आहेत याची आकडेवारीच बच्चू कडू यांनी जाहीर केले. त्यांनी याबाबत त्यांचा फॉर्मुला सांगितला. ते म्हणाले की, राज्यातील एकूण 9 जिल्हे आहेत की जेथे मराठा वास्तव्यास आहेत. तेथील कुटुबांची संख्या 4 लाख एवढी आहे. आपण 8 जिल्हे पकडले तर 8 जिल्ह्यातील एकूण संख्या 32 लाख एवढी होईल. त्या 32 लाखातील अर्धे बाद झाले, मग राहिले अर्धे 16 लाख. 16 लाखांचे 4 गुणा केल्यास 64 लाख होतात. आता, 36 लाख लोकांना प्रमाणपत्र भेटलंय. राहिला विषय 36 लाखांचा, त्याला तुम्ही विरोध करताय. पण, इकडे मराठा कायदेशीर मार्गाने कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे, ते कोणीही रोखू शकत नाही असाही दावा बच्चू कडू यांनी यावेळी केला. तेव्हा ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून काय उत्तर मिळतं हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : राजाच जर नौटंकीबाज असेल तर; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

नुकसानाच्या पाहणीला विरोध करणाऱ्यांना भुजबळांचा विरोध

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी येऊ नका, असे काही जण म्हणतात, याला छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. येऊ नका म्हणणारे किती लोक आहेत आणि ज्यांना मी यावे, असे वाटते. ते किती लोक आहेत. हे बघावे लागेल. असा टोला भुजबळ यांनी विरोध करणाऱ्यांना लगावला.